अमळनेर प्रतिनिधी- समाजातील अनेक माणसं वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत असतात. कोणत्याही प्रकारची प्रमाणीकपणे केलेली सेवा म्हणजे सर्वात मोठे पुण्य असते, म्हणजे समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न असतो असे प्रतिपादन जेष्ट अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनी आंबेडकर जयंती निमित्त जिजाऊ तृष्णा शांती केंद्राचे उदघाटन करताना केले
पिंपळे रोड वर दीड ते दोन किमी अंतरापर्यंत आयटीआय च्या विद्यार्थी तसेच जययोगेश्वर महाविद्यालयाचे विदयार्थी व प्रवासी साठी पाणपोईची सुविधा नव्हती अरुण देशमुख यांनी स्व पार्वतीबाई देशमुख यांच्या स्मरणार्थ जिजाऊ तृष्णा शांती केंद्र सुरू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून उदघाटन कृष्णा पाटील यांनी केले अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रा अशोक पवार होते यावेळी नवयुग मित्र मंडळाचे विलास पाटील , अमोल बोरसे, बबलू पाटील , यशवंत ट्रेलर, जयराम पाटील, हजर होते अरुण देशमुख यांनी आभार मानले