अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
1० वीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणात ३५० झाडे जगवणा-या मुनसिंग भिलचा सत्कार
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,जळगांव(DIECPD),आणि शिक्षण विभाग(माध्य),जि.प.जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षा अभियान अंतर्गत इ.10 वी पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक प्रशिक्षण महाराष्ट्रात प्रत्येक तालुकास्तरावर दि.9/4/2018 ते 20/4/2018 दरम्यान सुरू आहे. नुकतेच 13 रोजी अमळनेर येथील ग. स.हायस्कूल मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे प्रशिक्षण संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणात एक अभिनव व नाविन्यपूर्ण असा अभ्यासपूरक उपक्रम तज्ज्ञ मार्गदर्शक तथा विषय सुलभक डी. के. पाटील(साने गुरुजी हायस्कूल, अमळनेर) व निरंजन रमेश पेंढारे (श्री. बी बी. ठाकरे हायस्कूल, वावडे) यांनी प्रत्यक्ष सादर केला, त्यासाठी त्यांना प्रशिक्षणार्थी सर्व शिक्षकांचाही पाठिंबा मिळाला.
सविस्तर वृत्त असे की,विज्ञान व तंत्रज्ञान भाग -2, प्रकरण क्र.4 " पर्यावरणीय व्यवस्थापन " यात पर्यावरण संवर्धन-आपली सामाजिक जबाबदारी ह्या उपघटक अंतर्गत *एक लहान माणसाची मोठी गोष्ट* पान क्र.42 वर देण्यात आली असून संपूर्ण देश वासीयांसाठी *दीपस्तंभ* ठरावी अशी ती कथा आहे.
आसाम मधील जोरहट जिल्ह्यातील कोकीलामुख येथील रहिवासी *जादव मोलाई पयांग*यांनी एकट्याने 1360 एकर चे जंगल तयार केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने *पद्मश्री* पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती),पुणे यांनी सुद्धा अभ्यासक्रमात त्यांना स्थान दिले. याचाच आधार घेत वरील उपक्रमशील शिक्षकांनी प्रशिक्षणादरम्यान अमळनेर तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील मुनसिंग पुना भिल यांनाच प्रत्यक्ष मंचावर उपस्थित केले .कारण जादव मोलाई यांच्याप्रमाणेच मुनसिंग यांनीसुद्धा पांझरा नदीकाठी स्मशान भूमीजवळ जवळपास 350 लहान मोठी झाडे जगविली आहेत .उन्हाळ्यात नदीत झरा खोदून डोक्यावरून पाणी आणून वृक्ष संवर्धन करणाऱ्या या असामान्य माणसाचे जेव्हा प्रशिक्षण कक्षात आगमन झाले तेव्हा सर्व विज्ञान शिक्षकांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले.
*विज्ञान शिक्षक मदतीसाठी सरसावले*
मुनसिंग यांनी प्रत्यक्ष शिक्षकांशी खास अहिराणीत संवाद साधला आणि कश्या परिस्थितीत आपण झाडे लावली तेव्हा शिक्षक अक्षरशः भारावून गेले आणि सर्वांनी उत्फुर्तपणे त्यांना आपापल्या परीने आर्थिक मदत केली .ह्या वेळी त्याची छोटीशी फिल्मही दाखविण्यात आली त्यासाठी पत्रकार चंद्रकांत पाटील(मुडी),गणेश चव्हाण (कळंबू)यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर उपक्रमासाठी DIECPD चे प्राचार्य डॉ. गजानन पाटील, माध्य.शिक्षणाधिकारी देविदास महाजन, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. डी. बी. साळुंखे, डॉ.राजेंद्र महाजन, डॉ. भावना भोसले, गटशिक्षणाधिकारी ए. डी. बिऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षण समन्वयक राजेंद्र महाजन, पी. डी. धनगर, विषय तज्ज्ञ सुनील वनखेडे, प्रमोद पाटील, पुनवटकर यांची मदत झाली .
सदर प्रसंगी दीपक महाजन, अनिल महाजन, मिलिंद पाटील, विलास कुलकर्णी, नंदकिशोर पवार, बी. बी. पाटील, पी. व्ही. पाटील,बापू चव्हाण,संजीव पाटील, जगदीश कश्यप, नंदा पाटील, सरोज पाटील, कल्पना पाटील, मनीषा खांजोडकर, कीर्ती सोनार, वैद्य मॅडम, सोनवणे मॅडम, दिनेश सावळे, सुधीर पाटील, बी. डी. ठाकरे,प्रदीप सोनवणे, अरविंद बाविस्कर इ. विज्ञान शिक्षक उपस्थित होते