Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी-इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात गणित विषयातील संकल्पना  स्पष्ट करतांना अध्यापन पद्धती आनंददायी असली तर विदयार्थीनां विषयात गोडी वाटते. अध्यापनात भ्रमणध्वनीचा वापर केल्यास विदयार्थाच्या ज्ञानात भर पडेल असे अमळनेर येथे  जी एस हायस्कुलमध्ये दहावीचे नवीन अभ्यासक्रमाचे गणित विषयाच्या प्रशिक्षणात तंज्ञ मार्गदर्शक डि.ए.धनगर यांनी केले.
जळगाव जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेतर्फे इययत्ता 10 वि च्या पुनराचीत अभ्यासक्रम गणित विषयाच्या  तालुका पातळीवर  गणित प्रशिक्षणात शिक्षकांची प्रथमच क्यू आर कोड भ्रमाणध्वनिवरून स्कँन करून हजेरी नोंदविण्यात आली गणित तंज्ञ डी ए धनगर यांनी क्यू आर  कोड जनरेट केला होता  तालुका पातळीवरील हा राज्यात पहिला प्रयोग होता  हजेरीच्या माध्यमातूनच शिक्षकांना तंत्रस्नेही करण्याचा प्रयत्न झाला क्यू आर कोड  स्कॅन केल्यानंतर त्या त्या विषयाच्या विविध लिंक ओपन होऊन  पुस्तकाव्यतिरिक्त सर्व माहिती उपलब्ध होते त्यामुळे शिक्षकांना भ्रमणध्वनी वर्गात शिकवताना वापरवाच लागेल व शिक्षकांना संबनधित विषयाचे सखोल ज्ञान आणि अतिरिक्त माहिती मिळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास उपयोगी ठरणार आहे  भ्रमणध्वनी आवश्यक झाले असून वर्गात शिकविताना अतिरिक्त ज्ञानासाठी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून क्यू आर कोड चा वापर करावा लागणार आहे अनेक शिक्षक  अद्याप कोड स्कॅनर बाबत अनभिज्ञ आहेत
        अमळनेर तालुका प्रशिक्षणात राज्य पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शक डी ए धनगर , संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले विविध प्रमेय, सूत्रे नवीन पद्धती पुस्तकातील बदल यावर डिजिटल पडद्यावर चर्चा झाली यावेळी शिक्षण विस्टार अधिकारी आर डी महाजन, विषय तज्ञ प्रमोद पुनवटकर, वानखेडे, यांनीही मार्गदर्शन केले नव्या अभयसक्रमात शासनाने जि एस टी कर लागू केल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच  10 वि गणितात जि एस टी प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे नेमका जि एस टी काय आहे हे सर्वांना सविस्तर कळणार आहे शिबिरास मुख्यध्यापक सतीश देशमुख, मुख्यध्यपक अनिता बोरसे, मुख्याध्यपक राजेंद्र पाटील , मुख्याध्यपक आर पी मुसळे , बेहरे, पी डी पाटील, के यू बागुल , निरंजन पेंढारे , सुनील पाटील , दीपक महाजन  गोपाळ हडपे ,ए पी वाणी, आर ए शिंदे,  हजर होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.