Halloween party ideas 2015


*महात्मा फुले पुतळयाला मान्यवरांनी केले अभिवादन*
*मेळाव्याला २०० शिक्षकांची उपस्थिती*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत.पण शिक्षकांच्या समस्या सोडण्यासाठी नाशिक विभागातून शिक्षक आमदार न मिळल्याने समस्या वाढत गेल्या. आता तीच पुनरावृत्ती केली तर शिक्षकी पेशा बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी तळागाळातील अभ्यासू व शिक्षक आमदार म्हणून प्रतिनिधी करणारा एकमेव उमेदवार विलासराव पाटील आहे त्यांच्या मागे उभे राहून स्टारप्रचारक बना असे धुळे येथे शिक्षक मेळाव्यात प्रचार्य बी.बी.पाटील अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
  अगोदर महात्मा फुले यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले. तेथेच शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील यांचा प्रचार नारळ फोडण्यात आला. विचारपिठावर शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील
समता परीषदेचे धुळेजिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, अँड संभाजी पगारे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुनील बडगे,मनोज पाटील,नितीन शेलार, खैरनार,ईश्वर महाजन होते.
   विधान परीषदेत शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी व न्याय मागच्या शासन दरबारी मांडण्यासाठी विलासराव पाटील सारख्या सामान्य शिक्षकांच्या मागे उभे राहून त्यांना नाशिक, मालेगाव, नगर, नंदुरबार, धुळे, जळगांव येथील शिक्षक खंबीरपणे पाठीशी उभे असून हि लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे त्यामुळे विलासराव पाटील यांच्यासाठी कामाला लागा व सामान्य शिक्षकास आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे देवेंद्र पाटील, सुनिल बडगे,मनोज पाटील, नितीन शेलार, ईश्वर महाजन,काशिनाथ माळी यांनी सांगितले. तर शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील म्हणाले कि मी२००६ व२०१२ या दोन वेळी मी शिक्षक आमदारकी लढवली त्यात मला अपयश आले.पण त्यातून मी पंधरा हजार शिक्षकापर्यत गेलो.त्यांच्या समस्या जाणल्या,अपयश आले तरी काम करीत राहिलो. निवडणुकीत मी लढण्यासाठी उभा असतो.यावेळी पाचही जिल्ह्यात वातावरण चांगले आहे.शिक्षकाच्या समस्या व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संस्थाचालक व शिक्षकांचे प्रश्न जटील झाले आहेत.शिक्षकांच्या सुरक्षेतेसाठी व सन्मानासाठी व न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी आहे असे त्यांनी सांगितले
प्रस्ताविक धुळे जिल्हाध्यक्ष काशिनाथ माळी यांनी केले.सुत्रसंचलन राहूल महाजन यांनी केले.मेळाव्यास नाशिक, जळगांव, धुळे, नगर, मालेगांव, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.