Halloween party ideas 2015

तिसर्या दिवशी तहसीलदार यांनी ज्युस पाजून सोडले आज प्रकल्पग्रस्थांचे उपोषण .

उपोषणकर्त्याची दखल संबंधित राज्यमंत्री गुलाबराव पाटील व ना. दादा भुसे यांनी तहसीलदार यांच्याशी केली दूरध्वनीवर चर्चा

१९ तारखेच्या बैठकीचे  उपजिल्हाधिकारी यांनी दिले पत्र

अमळनेर प्रतिनिधी-

प्रकल्पग्रस्त पाडळसरे येथील उपोषणकर्त्या तिसर्या एका उपोषणकर्त्याला आज प्रकृती खालावल्याने डाॅक्टरांच्या सूचनेवर  पोलिसांनी यांनी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले  मात्र चौथी उपोषणकर्ती महिलेचीही साखर कमी झाली. उपोषणकर्त्या बाबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपजिल्हाधिकारी सुलाने यांच्याशी तर ना दादा भुसे हे तहसीलदार प्रदिप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलले तसेच प्रांत अधिकारी संजय गायकवाड यांनी सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना कळविल्या नुसार   उपजिल्हाधिकारी श्री सुलाने यांनी १९ तारखेला दुपारी १२ वाजता प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्याची बैठकीचे पत्र प्रात अधिकारींना दिल्याने आज रात्री ८ वाजता तहसीलदार प्रदिप पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डाॅक्टर राजेंद पिंगळे,उपतालूका प्रमुख चंद्रशेखर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड व्हि आर पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील, शिवसेनेचे  शहर प्रमुख प्रताप शिंपी , नगरसेवक संजय पाटील, मार्केटचे संचालक प्रफुल्ल पवार, मंडळ अधिकारी बी आर शिंदे, मराठी गौरव शिरसाठ, पाडळसरे विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, हेमंत पाटील    यांच्या हस्ते उसाचा च्युस पाजून तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर सोडण्यात आले व ग्रामपंचायतीचे कुलुपही सकाळीच उघडण्यात आलें.

प्रकल्पग्रस्त पाडळसरे येथील उपोषणकर्त्यानी सोमवारी दुपारी गृहसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकून कार्यालया समोरच  उपोषणाला सुरूवात केली होती. त्यात काल दोन उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने डाॅक्टर प्रशांत कुलकर्णी यांच्या अहवालाने पोलीसांनी गोपीचंद पाटील व यशोदाबाई पाटील यांना  अमळनेर येते ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलें होते. व प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्याच्या मागण्या बाबत मंगळवारी सायंकाळी प्रात अधिकारी संजय गायकवाड यांनी पुनर्वसन समिती सोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच आज बुधवारी दुपारी डिवायएसपी रफिक शेख यांनी उपोषणकर्त्याची चौकशी केली. त्यात तीसरा उपोषणकर्ता ज्ञानेश्वर पाटील यांची साखर कमी झाली व लघविचा त्रास वाढल्याने त्थास अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने एक विधवा महिलेचे उपोषण सुरू होते. आज बुधवारी  रात्री ८ वाजता तहसीलदार प्रदिप पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्त व पाडळसरे येथील नागकांसमवेत उपजिल्हाधिकारी सुलाने यांचे पत्र देऊन उसाचा रस पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुक्यातील व ग्रामीन भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.