Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी  येथील महात्मा फुले। हायस्कूल मध्ये ११ एप्रिल महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. क्रार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एच ओ.माळी यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. शाळेतील विस विदयार्थीनी महात्मा फुले यांच्या बाबत माहीती सांगितली.माधवी सपकाळे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला.
   अध्यक्षिय भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले कि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशाला प्रेरणादायी आहे.फुलेचे गुलामगिरी या ग्रथाचे वाचन विदयार्थीनी करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.आर.महाजन यांनी केले.यावेळेस एस.के.महाजन,संभाजी पाटील, गुरूदास पाटील व विदयार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.