अमळनेर प्रतिनिधी-
देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मधील ईश्वर रामदास महाजन यांना मालेगांव येथे एच्छवर्य मंगल कार्यालयात उपक्रमशिल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
सदर पुरस्कार शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष व शिक्षक आमदार कपील पाटील ,ग्रामविकासमंत्री दादा भुसे,राज्याध्याक्ष अशोक बेलसरे,नवनाथ गौड,के.के.अहिरे,राजेंद्र लोढे,नारायण वाघ,भरत शेलार, आर.जे.पाटील, सभापती प्रतिभा सुर्यवंशी,राजेंद्र जाधव
यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे याबाबत कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले सदर शिक्षक मेळाव्यात शंभर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सदर मेळाव्यात शिक्षक आमदार कपील पाटील यांनी शासनाच्या शिक्षण क्षेत्रात होणारे बदल हि शिक्षकासाठी धोक्याची घंटा आहे.शिक्षकांना नवनवीन अध्यादेश काढून शिक्षकाचे मानसिक संतुलन बिघडवण्याचे काम करीत आहे.अनेक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे.यासाठी शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षक भारतीच्या पाठीशी उभे राहावे असे सांगितले. तर ग्रामीणविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले मराठी शाळांची गुणवत्ता वाढत असून इंग्रजी शाळेतील मुले मराठी शाळाकडे येऊ लागल्यामुळे शिक्षक प्रामाणिक काम करीत आहे त्याचा सत्कार शिक्षक भारती संघटनेने केला मी त्यांना धन्यवाद देतो.
नाशिक विभागातून ७००,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.