आ.कपील पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान.
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलचे शिक्षक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार
ईश्वर रामदास महाजन यांची नुकतीच शिक्षक भारती संघटनेने तालुक्यातून उपक्रमशिल शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाले. सदर पुरस्कारासाठी निवड शिक्षक भारती संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष नारायण वाघ,कार्याध्यक्ष आर.जे.पाटील यांनी केली. सदर पुरस्कार ३०/३/२०१८ वार शुक्रवारी ऐच्छवर्य मंगल कार्यालयात आ.कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार ईश्वर महाजन हे आपल्या शाळेत स्पर्धा परीक्षा,शैक्षणिक उपक्रम राबवत असतात, विदयार्थीचा सर्वागीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. यापुर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याच्या यशाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्याक्ष विलासराव कोळेकर, धुळे जिल्हाध्यक्ष संतोष भोई, संपर्क प्रमुख सोमनाथ पाटील, सुनील पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी, जिल्हासदस्य निरंजन पेढांरे, विजय पाटील, व तालुका कार्यकारणी प्रा पि.के.पाटील, भूषण चौधरी, प्रल्हाद पाटील, भूषण बिरारी, गं का.सोनवणे
यांनी केले