अमळनेर प्रतिनिधी
भालेराव नगर मधील रहिवासी तथा मार्मिक समाचारचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल भालेराव नगर मित्र मंडळाच्या वतीने रामकृष्ण बी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी हायस्कूल तांबेपूराचे मुख्याध्यापक एम.ए.पाटील,प्राथमिक शिक्षक सुनिल देवरे,संदिप साळुंखे,उद्योजक जितेंद्र चंद्रात्रे, रिलायन्स जिओचे एरिया मँनेजर किशोर पाटील,महालक्ष्मी क्लिनिकल अँनालिसिस लँबचे संचालक संजय मुसळे,नामको बँकेचे अँसिसटंड ब्रँच मँनेजर ललित कांकरिया,अँड. दिनेश पाटील यांच्यासह विजय पाटील,गुलाब चव्हाण, डि.जी.पाटील,परमेश्वर पाटील,श्रीराम पाटील आदी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
