Halloween party ideas 2015

*लायनेस क्लब अमळनेर व दाऊदी बोहरा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रकल्प संपन्न*


अमळनेर प्रतिनिधी
दिनांक १९ ऑक्टोबर २०२०-आज रोजी लायनेस क्लब ऑफ अमळनेर व दाऊदी बोहरा महिला मंच यांच्या सौजन्याने" बेस्ट आऊट ऑफ वेस्ट "या प्रकल्पा अंतर्गत समाजातील अत्यंत गरजू १५ मुलींना फ्रॉक चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम हा दाऊदी बोहरा समाजाच्या महिला मंच कडून अव्याहतपणे सुरू असून अनेक गरजूनी या उपक्रमाच्या आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. सदर कार्यक्रम हा लायनेसच्या डिस्टिक ऍडमिनिस्ट्रेटर सौ. जस्मिन भरुचा यांच्या विनंतीवरून त्यांच्या घराच्या परिसरात घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमास लायनेस क्लब तर्फे जस्मिन भरूचा, सेक्रेटरी सौ. शारदा अग्रवाल उपस्थित होते तर दाऊदी बोहरा समाजातर्फे शिरीन करमपुरवाला, सौ.अजब बेन ईजी ,सौ. मेहराज मकसूद हुसेन यांनी सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले .


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.