Halloween party ideas 2015

रावेर, हाथरस व भुसावळ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार विरोधात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण

अमळनेर शहरप्रतिनिधी,
येथील आदिवासी एकता संघर्ष समिती,भिम आर्मी अमळनेर, वाल्मिकी मेहतर समाज व राष्ट्रीय एकता परिषद,अमळनेर इत्यादी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील रावेर, भुसावळ व उत्तर प्रदेश येथिल हाथरस मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्याया विरोधात अमळनेर प्रांताधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले.

जलद न्यायालयात खटला चालवावा, पीडित कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य करावे, अनुसुचित जाती - जमाती वर होणाऱ्या अन्याया विरोधात कडक कायदा करावा इत्यादी मागण्यासह धरणं आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. प्रशासन आणि न्याय पालिका कोणतीही ठोस कार्यवाही करत नाही त्यामुळे गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. शासनाने फास्ट ट्रॅक न्यायालयात बलात्काराच्या केसेस चालविल्या जातील की जेणे करून पिडीत व्यक्तीला न्याय मिळेल परंतु निर्भयाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही 8 वर्ष न्याय मिळण्यासाठी लागले असा कोणता फास्ट ट्रॅक न्याय आहे हा असा सवाल विचारत कागदोपत्री फास्ट ट्रॅक न ठेवता खऱ्या अर्थाने जलद गतीने पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन बांधील आहे वेळ काढू पणा करू नये.. रावेर आणि इतर पिडीत कुटुंबातील सदस्य यांना सरंक्षण द्यावे लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास सर्व सामाजिक आणि आदिवासी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असे स्पष्ट शब्दात प्रा जयश्री दाभाडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले आहे.
तसेच उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्याशी चर्चा करताना प्रा जयश्री दाभाडे यांनी निर्भया पथकाची मागणी केली आहे

याप्रसंगीआदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री साळुंके,वाल्मिकी मेहतर समाजाचे उपाध्यक्ष पपु भाऊ कलोसे,भिम आर्मीचे बाळासाहेब सोनवणे, भिम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रवीण बैसाणे,राष्ट्रीय एकता परिषदेचे आनंद भिल, कृष्णाकांत शिरसाठ,
पुनमचंद पारधी,महेंद्र साळुंके, भिमराव पवार,राजा पारधी,मनोज पवार,अर्जुन पारधी,रमेश भिल,महेश पाटील,हर्षल जाधव,तौसीफ तेली ,अनिल पारधी,भुरा पारधी,शांताराम पारधी, उमेश कलोसे. रतन जयदे,संजय भिल,अर्जुन सरोदे आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


या आंदोलनाला तालुक्यातील अनेक सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक पत्रकारिता संघटना,कार्यकर्ते,पदाधिकारी, यांनी पाठींबा जाहीर केला.
यात प्रामुख्याने महेश पाटील युवक काँग्रेस अमळनेर, रियाझ मौलाना,सत्तर मास्तर,युथ सेवा फाउंडेशन, अमळनेर, संतोष पाटील,तालुका काँग्रेस अमळनेर,महेंद्र पवार, जय आदिवासी युवा शक्ती अमळनेर, 
मा पंचायत समिती सदस्य पुनमचंद निकम,सर्पमित्र गणेश शिंगारे,सामाजिक कार्यकर्ते आणि सबगव्हान सरपंच नरेंद्र पाटील इ नी पाठींबा दिला आहे.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.