Halloween party ideas 2015

मेडिकलच्या नीट परीक्षेत तालुक्यातुन तीन विद्यार्थी ठरले अव्वल.
आ.अनिल पाटलांनी घरी जाऊन केला सत्कार.

प्रतिनिधी अमळनेर-

मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेत अमळनेर तालुक्यातील तीन गुणी विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवून एमबीबीएस प्रवेशासाठी ते पात्र ठरल्याने आ.अनिल पाटील यांनी प्रत्यक्षात तिन्ही विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील सत्कार केला.विशेष म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अनमोल मार्गदर्शन देखील आमदारांनी केले.
2020 या वर्षात अमळनेर तालुक्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेस बसले होते, त्यापैकी काही विद्यार्थ्यांना 720 पैकी तीनशे ते पाचशे दरम्यान गुण मिळाले आहेत, तर तीन विद्यार्थ्यांनी सहाशे पेक्षा अधिक गुण मिळवून मोठे यश मिळविले आहे, यात शेखर प्रल्हाद पाटील यास 616 गुण, आदित्य सुधाकर पाटील यास 610, प्रसाद दत्तात्रय पाटील 610 मिळाले आहेत. या तिन्ही विद्यार्थ्यांना फ्री शिप पहिल्याच फेरीमध्ये चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकणार आहे. शेखर हा एकलहरे येथील रहिवासी तथा भरवस शाळेचे शिक्षक प्रल्हाद वना पाटील (पि.व्ही.पाटील) यांचा सुपुत्र आहे, आदित्य हा टाकरखेडा येथील रहिवासी तथा श्री.शिवाजी हायस्कूल तांबेपुराचे पर्यवेक्षक सुधाकर मुरलीधर पाटील यांचा सुपुत्र असून आपल्या सोबतच लहान भावाला देखील नीट साठी तो मार्गदर्शन करीत आहे, तसेच प्रसाद हा रणाईचे आश्रमशाळेचे शिक्षक दत्तात्रय गुलाबराव पाटील (डी जी पाटील) यांचा सुपुत्र आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास व जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
आ.अनिल पाटलांना निकालाची माहिती मिळताच त्यांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे निवासस्थान गाठून शाल व बुके देऊन सत्कार केला, आमदारांच्या परिवारातुन कु.माधवी ही देखील एमबीबीएस करीत असल्याने या प्रक्रियेचा त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे, आमदारांनी या तिन्ही विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी कश्या पद्धतीने वाटचाल करावी जेणेकरून चांगले कॉलेज मिळू शकेल याबद्दल अनमोल मार्गदर्शन करून काहीही गरज वाटल्यास आपल्याशी केव्हाही संपर्क साधावा असे आवर्जून सांगितले.
यावेळी आमदारांसोबत राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, नगरसेवक विवेक पाटील, नगरसेवक अ‍ॅड.यज्ञेश्वर पाटील, चेतन राजपूत, गणेश भामरे, सचिन पाटील आदी उपस्थित होते


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.