दोघांचे सभासदत्व कायम राहणार
आशिया खंडात नामांकीत जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्या जळगाव ग.स,सोसायटी म्हणुन सगळ्यांना परिचित असलेल्या पतसंस्थेचे सभासद श्री रावसाहेब मांगो पाटील व श्री योगेश जगन्नाथ सनेर यांचेविरुद्ध ग.स संचालक मंडळाने सहकार कायदा १९६० चे कलम ३५ व १९६१ चे नियम २८ व २९ अन्वये दि.२५/८/२०१९ रोजी जनरल सभेत दोन्ही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा विषय पत्रिकेवर विषय घेवून ठराव मांडला वास्तविक सदर ठरावास सभासदांमधुन तिव्र नापसंती असतांना व जनरल सभेवेळी सभासदांचा विरोध असतांनादेखील संचालक मंडळाने सभासदांच्या भावनांकडे दुर्लक्षकरीत मा..जिल्हा उपनिबंधक जळगाव श्री मेघराज राठोड यांचेकडे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव दि.३१/१०/२०१९ रोजी पाठवला,प्रस्तुत प्रस्तावावर म,जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयात सुनावण्या झाल्या त्यात *संस्थेच्या वतीने अँड.श्री डी आर खेवलकर व अँड.विक्रम पवार अँड.श्री वसीमशेख यांनी कामकाज व युक्तीवाद केला तर श्री रावसाहेब पाटील व योगेश सनेर यांचेतर्फे अँड.प्रविण ईश्वर पाटील* यांनी जोरदार युक्तीवाद करीत संस्थेने वरील सभासदांवर केलेली कारवाई ही संस्थेच्या हिताची नसुन संचालक मंडळास वरील दोन्ही सभासद भविष्यकाळात निवडणुकीवेळी वरचढ होवू नयेत या गैरउद्देशाने केलेली असल्याचे पुराव्यासह मांडले.दोन्ही बाजूंचा युक्तीवादानंतर म.जिल्हा उपनिबंधक यांनी आपल्या निकालपत्रात निष्कर्ष नोदवतांना म्हटले आहे की,सहकारी संस्था नियम १९६१ चे २८नुसार संस्थेचे आर्थिक नुकसान व संस्थेची बदनामी करणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात येते मात्र या प्रकरणात संस्थेने सुनावणीवेळी व वकीलामार्फत केलेल्या युक्तीवादात श्री रावसाहेब मांगो पाटील व श्री योगेश जगन्नाथ सनेर यांचेविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे ग.स.संस्थेने सादर कलेले दिसुन आलेले नाहीत तसेच १९६१ चे नियम २९ अन्वये सभासदत्व रद्द करणेबाबत कार्यकारी मंडळाच्या ठरावानंतर सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येतो तथापी ज्यांचे सभासदत्व रद्द करायचे आहे अशा सभासदांना सर्वसाधारण सभेच्या किमान एक महीना अगोदर नोटीस देवून खुलासा सादर करण्याची संधी दिली जाते मात्र प्रस्तुत प्रकरणात कोणतेही नोटीस दोन्ही सभासदांना एक महीना अगोदर प्राप्त नाही तसेच सर्वसाधारण सभेत संबधीत सभासदांना त्यांची बाजू मांडण्याची कोणतेही संधी दिलेली दिसून येत नाही याउलट अध्यक्ष व संचालक मंडळाने उपस्थीत सभासदांच्या ३/४ सभासदांचे मतदानाने ठराव पारीत झालेला आहे का ?किती सभासदांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे याबाबत कोणतेही आकडेवारी किँवा सविस्तर माहीती संस्थेने सादर केलेली नाही त्यामुळे दोन्ही बाजुंचे युक्तीवाद निरिक्षण व निष्कर्ष यास अनुसरुन जिल्हाउपनिंबधक मेघराज राठोड यांनी ग.स, सोसायटीचा दोन्ही सभासदांना अपात्र करण्याचा आदेश खालील मुद्द्यांना अनुसरुन नामजुर केला १) अर्जदार संस्थेने सादर केलेला प्रस्ताव प्रतिखुलासा कागदपत्रे व तोँडी युक्तीवाद संबधीत जाब देणार यांना संस्थेने किमान एक महीन्याच्या आत नोटीस पोहच झाल्याचे दिसुन येत नाही २)अर्जदार वार्षिक साधारण सभा दि,25/8/2019 मध्ये सदर जाब देणारा यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे वाजवी संधी दिल्याचे/त्यांचे म्हणणे ऐकुन घेण्याची संधी दिसुन येत नाही ३) प्रस्थापित कायदा तरतुदी व सादर केस लाँ.प्रमाणे ३/४ बहुमत झाले आहे किंवा नाही हे सिद्ध होत नाही यामुळे संचालक मंडळास चपराक बसलेली असुन हा निकाल संस्थेच्या इतिहासात ऐतिहासीक निकाल असल्याची सभासदांची भावना आहे . सभासदांचे आभार- (रावसाहेब पाटील) सभासदांच्या आशीर्वादाने हा निकाल आमच्या बाजुने लागला सत्य परेशान है पराजीत नही जिल्ह्यात आठ ते दहा हजार सभासदांनी आमच्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून जनरल सभेवेळी प्रामाणिकपणे साथ दिली त्या सर्व सभासदांचे व हितचितंकाचे मनापासून आभार भगवान के घर देर है अंधेर नही - (योगेश सनेर ) जळगाव जिल्ह्यातील सर्व ग ,स सोसायटी सभासद ज्यांनी आम्हांला स्वाक्षरीरुपी आशीर्वाद शुभेच्छा देवुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साथ दिली तसेच प्रसारमाध्यमांनीदेखील अन्यायाला वाचा फोडून ग.स त सभासदांचा आवाज बुलंद ठेवला म्हणुन सभासद व हितचितंकांचे मनापासून धन्यवाद *निकाल मिळाला माहीती अधिकारात*-- म,जिल्हा उपनिबंधकांकडील २८ जानेवारी,२०२० चा निकाल प्रत्यक्षात जानेवारी २०२० मध्ये मिळणे अपेक्षित होते मात्र तो न मिळाल्याने सनेर यांनी फेब्रुवारी महीन्यात माहीती अधीकारात माहीती १५/२/२०२० रोजी मागीतली तरीही माहीती न मिळाल्याने अगर सदर आदेश न मिळाल्याने श्री सनेर अपीलात गेले असता अपील दि,८ जुलै,२०२० रोजी अपील मंजुर झाले व एक महीन्याच्या आत मागीतलेला निकाल कागदपत्र देण्याचे आदेशीत होते मात्र तरीदेखील शेवटी जानेवारी २०२० चा निकाल संबधीत सभासदांना माहीती अधिकार अंतर्गत २ सप्टेंबर २०२० रोजी दिला गेला *विषय क्रमांक बारा कशासाठी? श्री रावसाहेब मांगो पाटील व श्री योगेश जगन्नाथ सनेर यांनी गेल्या पाच वर्षापासुन सभासद हितासाठी आपला वेळ व स्वतःचा वैयक्तिक पैसा खर्च करुन ग.स,त झालेली नातेवाईकांची नोकरभरती तसेच अमळनेर इमारत कारण नसतांना केलेली विक्री बेनामी अपसंपदेप्रकरणी ग.स,संचालकाची चौकशी तसेच सहकार कायदा १९६० चे कलम ८३ व ८८ अन्वये अफरातफर चौकशी सुरु असल्यानेच व त्याबाबतच्या बातम्या पुराव्यासह वृत्तपत्र व सोशल मिडीयावर जाहीर झाल्याने ग.स,चा भ्रष्टाचार बाहेर येत असल्याच्या रागातुनच संचालकांनी भविष्यकाळात निवडणुकीवेळी ही मंडळी वरचढ होवु नये या उद्देशानेच हा विषय जनरल सभेत ग.स,संचालकांनी मांडलेला असल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे
