साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर
आमच्या शाळेत ऑनलाईन घटक चाचणी परीक्षा संपन्न .
अमळनेर प्रतिनिधी
सन 2020 - 2021 या शैक्षणिक वर्षात कोरोना संसर्गजन्य आजाराची परिस्थिती असतांना शैक्षणिक कामकाज ऑनलाईन पध्धतीने सुरु आहे .
त्यात शैक्षणिक व्हिडिओ , गुगल मीट च्या सहाय्याने तास घेणे . दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात चाचणी परीक्षा होते.त्यामूळे विद्यार्थिनी अभ्यासक्रमाची उजळणी करतात व म्हणून
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या संकल्पनेतून कल्पना आली ऑनलाईन टेस्ट घ्यावी . त्यांच्या सुचनेला सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी होकार दिला . संस्थेचे अध्यक्ष श्री.हेमकांत पाटील, संस्थेचे सचिव श्री.संदिप घोरपडे सर, सहसचिव श्री.अशोक बाविस्कर व संचालक मंडळ यांच्या प्रेरणेने चांगल्या पद्धतीने वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा उत्कृष्ठ पद्धतीने दि. 2 / 9 / 2020 ते 4 / 9 / 2020 या तीन दिवसात 352विद्यार्थांनी ऑनलाईन टेस्ट दिली .
विद्यार्थीनींनी आनंददायी वातावरणात परीक्षा दिली. सदर उपक्रमाचे विद्यार्थिनींचे पालकांनी व संचालक मंडळाने कौतुक केले.