Halloween party ideas 2015

‌अमळनेर प्रतिनिधी

दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा ह्या पिकाच्या निर्यात बंदीचा आम्ही जाहीर निषेध करतो, मागच्या वर्षी अवकाळी पाऊस, नंतर कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन ह्यामुळे भारतीय शेतकरी पुरता संकटात सापडलेला होता आणि त्यातून तो कसातरी सावरतो आहे. सध्या कांदा पिकाला चांगला भाव मिळू लागला आहे आणि असे असतांना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी काल जाहीर केली म्हणजे त्यामुळे कांद्याचे भाव पुन्हा पडणार आणि शेतकऱ्याचे नुकसान होऊन तो पुन्हा आर्थिक अडचणीत सापडणार. रासातळाला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था प्रत्येक क्षेत्रात निगेटिव्ह असतांना फक्त कृषी क्षेत्रात पॅसिटीव्ह आहे. शेतकरीच अर्थव्यवस्थेचा तारणहार आहे हे केंद्र सरकारला कळू नये हे विशेष आहे. शेतकरी सुखी झाला तर इतर सुखी होतील त्यामुळे सध्या कांद्याला चांगले भाव आहेत तरी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले* यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना अमळनेर तालुकाध्यक्ष गिरीष पाटील. तालुका उपाध्यक्ष छायेंद्र देशमुख. विद्यार्थी सेल अध्यक्ष शुभम सुर्यवंशी संघटनेचे सदस्य मयुर साळुंखे. देवेंद्र माळी उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.