अमळनेर प्रतिनिधी
मध्यवर्ती शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देशात दि.१ सप्टेंबर पासून राष्ट्रीय पोषण अभियानास सुरुवात झाली आहे. सदर अभियान दि.१ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक अंगणवाडी केंद्रात राबविले जाणार आहे. अभियानांतर्गत सँम आणि मँम बालकांची काळजी घेणे,एक हजार दिवसांचे महत्त्व पटविणे, किचन गार्डन बनविण्यावर भर देणे, कुपोषण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे, ग्रुहभेटी व वजन यावर भर देणे,यासह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या अनुषंगाने जळगाव नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. विजयसिंग परदेशी आणि पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भवानी चौक,पैलाड,अमळनेर येथील अंगणवाडी क्रमांक ९१,१०१,११२ आणि ११३ यांच्या वतीने केंद्र क्रमांक ९१ मध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाचे जेष्ठ नागरिक गुलाबराव देवरे यांच्या हस्ते कोरोना संदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन करत उद्घाटन करून अभियानाचा प्रारंभ केला. सदर कार्यक्रमात परिसरातील महिला व बालके उपस्थित होते.उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ.उषा पाटील,सौ.सरला चव्हाण,कल्पना येवले,कल्पना शिंदे, मदतनिस मनिषा चौधरी, प्रतिभा पाटील, सुनंदा पाटील, ज्योती पाटील यांनी परिश्रम घेतले.

