वर्ल्ड पार्लमेंटकडून वंचितांची दखल
श्रीरामपूर : - संपूर्ण जगाला हदरविणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रतिकार करणाऱ्या श्रीरामपूरच्या वॉर्ड नंबर दोन मधील समाज सेवकांचा आदर पूर्वक सत्कार करून वर्ल्ड कॉान्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाची खाण्यापिण्याची मोठया प्रमाणात कुचंबना झाली असताना येथील वॉर्ड नंबर दोन मधील शाहीद सादीक कुरैशी (लब्बैक ग्रुप ), फिरोज हमीद खान ( मिल्लीते इब्राहीम ग्रुप ), तौफीक शब्बीर शेख ( एकता यंग सर्कल ) या मुस्लीम तरूणांनी स्वतःची पदरमोड करून जातीपातीचे बंधन तोडून सर्व गरजू लोकांना मदत करून आपले राष्ट्र कर्तव्य पार पाडले. या बाबीची दखल घेवून डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरने वरील समाजसेवकांचा एका साध्या समारंभात सन्मानपत्र व जेष्ठ साहित्यीक प्रा.लेविन भोसले लिखित " वेध : सामाजिक जाणीवांचा " हे पुस्तक देऊन गौरव केला.
या प्रसंगी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, जेष्ठ साहित्यीक प्रा.लेविन भोसले, सामाजिक कार्यकर्ते बबलू गायकवाड, दै. धुमाकुळचे संपादक इम्रान पटेल, आरिफ हसन बागवान, डॉ. सलिम शेख, हाजी इम्रानभाई शेख, फईम शेख आदी.उपस्थित होते.
