Halloween party ideas 2015

समाजसेवक व शिक्षण क्षेत्रातील नामांकित नेतृत्वास मुख्याध्यापक पदाची संधी म्हणजे आदर्श शाळेकडे वाटचाल : पत्रकार ईश्वर महाजन यांचे प्रतिपादन :
एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील नामांकित व क्रांतीकारी सामाजिक राजकिय धार्मीक सहकार क्षेत्रातील वारसा लाभलेले आडगाव येथील आडगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदी संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष मा बापूसाहेब शालीग्राम पाटील व संचालक मंडळ तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बांधवांनी सर्वानुमते व एका दिलाने तालुक्यातील व जिल्हयातील शिक्षक नेतृत्व मा प्रमोद पाटील चिलाणेकर यांना मुख्याध्यापक पदासाठी नियुक्ती केली खऱ्या अर्थाने . चळवळीतील व शिक्षकांची नव्हे तर सामान्य माणसाची जाण असणारे कृतीशील उत्साही सतत कामात व्यस्त असणारे समाजशील पत्रकार शिक्षकांची जाण असणारे व्यक्तीमत्वास मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी म्हणजे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच उपयोग होणार असल्याचे मत पत्रकार शिक्षक ईश्वर महाजन यांनी व्यक्त केले प्रमोद पाटील चिलाणेकर सरांचे काम सामाजिक शैक्षणिक साहित्य पत्रकारिता सहकार क्षेत्रात अत्यंत परिचित आहे अनेक मोठ मोठया संस्थांवर पदाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावित आहे नुकत्याच झालेल्या एरंडोल व धरणगाव तालुका शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीत सहकार गटाचे नेतृत्व करून स्वतः उमेदवारी घेऊन पॅनेलचा दणदणीत विजय मिळवून खऱ्या शिक्षक नेतृत्वास महत्व प्राप्त करून दिले सर्व जाती धर्माचा लोकसंग्रह त्यांनी आपल्या कार्य कौशल्यातून व चांगल्या स्वभावाच्या भाडवंलातुन निर्माण केला आहे म्हणून अनुभव नेतृत्व याचा फायदा मुख्याध्यापक पदाला नक्कीच न्याय मिळून शाळेच्या विकासात भर पडेल सरांना पुढील वाटचालीस महाराष्ट्र पत्रकार संघ राष्ट्रीय मानवधिकार संगठन तमाम जळगाव जिल्हयातील शिक्षक बंधू भागिनीकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा



*पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आमचे मित्र प्रमोदजी चिलाणेकर यांच्या निवडीबद्दल मराठी लाईव्ह न्युज,महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर, महात्मा फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा!💐💐💐

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.