अमळनेर तहसील कार्यालयात आज तहसीलदारांच्या अध्यक्षते खाली रेशन व रोजगार संदर्भात लोक संघर्ष मोर्चाची मीटिंग संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
लोक संघर्ष मोर्चाने अमळनेर तालुक्यात १५४ गाव असून अनेक गावात आदिवासी जमातीच्या कुटुंबांना व सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशनुसार जिल्ह्यातील आदिवासी सर्व मजूर,शेतमजूर आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिला आहे त्यानुसार अमळनेर तालुक्यातील आदिवासी लोकांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन बैठक संपन्न झाली त्या नुसार उद्या पासून प्रत्येक गावातील गरजू लोकांचे अर्ज लोक संघर्ष मोर्चाचे चे कार्यकर्ते गावोगाव जावून भरून घेतली व दिनांक ऑक्टोंबर महिन्यात रेशनकार्ड तयार करून गावोगाव शारीरिक अंतर लक्षात घेत वाटप केले जातील ह्या कामात लोक संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते अमळनेर तालुक्यातील सर्व १५४ गावांमध्ये जावून लोकांचे अर्ज भरून घेत शासनाला पूर्ण सहकार्य करतील रेशन कार्ड साठी चलन भरण्याची रक्कम आदिवासी विकास विभाग उपलब्ध करून देईल ह्या बाबत प्रतिभा शिंदे यांनी मुद्दे मांडताच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी पूर्ण नियोजन करत रेशनकार्डचा विषय तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले व तत्काळ कार्यवाही ही सुरू केली
रेशन इतकाच महत्वाचा विषय हा रोजगाराचा असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थ व्यवस्था अत्यंत खिळखिळी झाली आहे व लोकांची क्रयशक्ती ही संपली आहे ह्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 5 ऑगस्ट 2020 रोजी मनरेगा चा अत्यंत उपयुक्त व सर्वांना रोजगार उपलब्ध होईल असे शासन परिपत्रक बाबत हि चर्चा करण्यात आली सदर मीटिंग मधे लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे, मधुकर चव्हाण, संदिप घोरपडे सर, रियाज मौलाना, राजु मोरे, अविनाश पवार, रावसाहेब पवार, संदिप सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, सुनंदा भिल, हिराबाई भिल, मंगलबाई भिल,इंदुबाई भिल, निलाबाई भिल, आप्पा दाभाडे, गुलाब साळूंके, बालीक पवार, शांताराम चव्हाण, गणेश चव्हाण, छोटू सोनवणे, विलास भिल,रविंद्र भिल, संजय भिल,इत्यादी कार्यकर्ते हजर होते ह्या मीटिंगला लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले