Halloween party ideas 2015

ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेश दादा चव्हाण यांंचे हस्ते जलपुजन
*
ब्राम्हणशेवगे* ता.चाळीसगाव येथे आमदार मंगेश दादा चव्हाण, ईडीचे उपायुक्त उज्वलकुमार चव्हाण,स्वाप्टवेअर ईंजि.गुणवंतभाऊ सोनवणे,यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यात पाचपाटील टिम व जलमित्र परिवारातर्फे
शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा उपक्रम राबविण्यात आला.या अभियान अंतर्गत ब्राम्हणशेवगे येथेही दिनांक १७ एप्रिल२०२०ते १०जुन२०२० या छप्पन दिवसाच्या कामातून एक लाख चाळीस हजार घनमीटर काम रोटरी क्लब व सेवा सहयोग संस्थेमार्फत उपलब्ध झालेल्या पोकलँड मशिनद्वारे सोमनाथ माळी व सहकारींच्या अथक परिश्रमातून चक्क चौदा कोटी लिटर जलसाठा निर्माण झाला आहे. याकामी शेतकऱ्यांनी शासनाचे करोडो रुपये वाचवत फक्त सहा लाख पंचवीस हजार रपये लोकसहभागातून कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत येवढे मोठे काम उभे केल्याने व हि संपुर्ण मातीबांध ओव्हरफ्लो झाल्याने या खोलीकरणाच्या मातीबांधाचे पाण्याचे जलपुजन चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे हस्ते दि.१३सप्टेंबर२०२० रोजी झाले याप्रसंगी भुजल अभियानाचे स्वाप्टवेअर ईंजिनीअर गुणवंतभाऊ सोनवणे,पं.स.मा. उपसभापती संजय तात्या पाटील,दयाराम सोनवणे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला ब्राम्हणशेवगे येथील खालच्या शिवारातील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे पुजन करण्यात येऊन मान्यवरांचे शाल श्रीफळ तसेच झाडांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. नंतर श्री. किशोर राठोड यांचे शेतालगत असलेल्या खोलीकरण झालेल्या मातीबांधाचे श्रीफळ वाहून पुजन करण्यात आले. याप्रसंगी ब्राम्हणशेवगे व नाईकनगर येथील शेतकरी श्री. उखाबाबा राठोड, जगराम राठोड,ग्रा.प.चे मा.उपसरपंच शांताराम नेरकर, पोलीस पाटील राजेंद्र माळी,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन विष्णू राठोड,नानाभाऊ राठोड, किशोर राठोड, बळीराम चव्हाण, दादा राठोड, नरेंद्र राठोड,अभोन्याचे राहुल राठोड,नवल राठोड, सुनील पवार तसेच शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा टिमचे पाचपाटील सोमनाथ माळी व शेतकरी उपस्थित होते.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.