Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा
साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे शिक्षक दिन ऑन लाईन पध्दतीने साजरा करण्यात आला . मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांचा संकल्पनेतून हा कार्यक्रम मूर्त स्वरूपात साजरा झाला . यासाठी मा . मुख्याध्यापिका बोरसे मॅडम व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले . शाळेतील एकूण 18 विद्यार्थीनींनी शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाची भूमिका पार पाडली व मुख्याध्यापिकांची भूमिका कु. कोमल किशोर पवार हिने पार पाडली .
दुपारी12 ते 2.40 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने गुगल मीट अँँपवर आजच्या विद्यार्थीनी - शिक्षक / शिक्षिकांनी अध्यापन प्रक्रिया पारपाडली . कोवीड -19 च्या संकट काळात विद्यार्थिनींना आनंद देता येतो हे मा . मुख्या . बोरसे मॅडमांच्या संकल्ल नतून दिसून आले . शाळेच्या विद्यार्थिनींनी वेगळ्या आनंदाची अनुभूति घेतली . दुपार सत्रात ऑन लाईन छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला . त्यात मा . डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मा . बोरसे मॅडमांच्या हस्ते करण्यात आले . शिक्षक भूमिकेत असलेल्या विद्यार्थिनींनी गुरुजनांविषयी शाळेविषयी आदर व्यक्त केला . तसेच पालक वर्गा तर्फे सौ . संगीता पवार व श्री.विलास चौधरी यांनी सर्वांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमांचे अध्यक्षीय स्थान कु . कोमल पवार ( मुख्याध्यापिका भूमिका ) यांनी भूषविले . सूत्रसंचालन सौ. विद्यादेवी पाटील मॅडम यांनी केले . कार्यक्रमाला मोठ्या संखेने विद्यार्थीनी व पालक वृंद उपस्थित होते . अ . शि . प्रसारक मंडळांचे मा . संचालक मंडळ यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतूक केले . आभार श्री . मुकेश पाटील सरांनी व्यक्त केले .
फोटो





WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.