*शिक्षण विभाग जळगाव यांनी राबवलेल्या "आपला जिल्हा आपले उपक्रम" या डिजिटल ईबुक मंध्ये उपक्रमशील शिक्षिका कल्पना पाटील यांच्या उपक्रमाचा समावेश.*
रावेर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा निंबोल येथील उपशिक्षिका कल्पना दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी पध्दतीने कृतीयुक्त शिक्षण म्हणून राबविलेला शैक्षणिक उपक्रम ज्ञान रचनावादी पध्दतीने विद्यार्थ्यांना स्वंयम अध्ययनाची सवय लावणे हा आहे.या उपक्रमास जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आयटीसेलचा नाविन्यपूर्ण उपक्रम "आपला जिल्हा आपले उपक्रम भाग-2" या डिजिटल ईबुक मंध्ये रावेर तालुक्यातील उपक्रमशील,आदर्श शिक्षिका कल्पना पाटील यांच्या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या डिजिटल ईबुकचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील,प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे,
उपशिक्षणाधिकारी डि.एम.देवांग,या उपक्रमाचे मुख्य सुत्रधार व संपादक शिक्षणविस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे,प्रवर्तक अरूणा उदावंत,पंकज पालिवाल,राजेंद्र कोळी,आर.आर.पाटील, संदिप पवार, कल्पना पाटील, सोनाली साळूंखे,विजया पाटील,उपस्थित होते.ईबुक भाग-2 चे प्रकाशन शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले.
कोरोना लाँकडाऊनच्या काळात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्हाभरातून उपक्रमशील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञान रचनावादी पध्दतीने अध्ययन-अध्यापन प्रकिया पार पाडून विद्यार्थ्यांना स्वंयम अध्ययनाची गोडी लावणारा हा उपक्रम म्हणजे एक अभिनव प्रयोग ठरेल.हा उपक्रम,व डिजिटल ईबुक भाग-1 ते 4 यामुळे शिक्षकांना खुप मार्गदर्शक ठरणार आहे.या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*"चला ज्ञान रचना वादी होवूया।*
*प्रगत महाराष्ट्र घडवूया।"*
