Halloween party ideas 2015

महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवतांना विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
कोरोनामुळे प्रवेश शुल्कासाठी टप्पे द्यावेत.
रा.वि.काँग्रेस अमळनेरचे महाविद्यालयांना आवाहन.

प्रतिनिधी अमळनेर

कोरोनाचा फैलाव वाढत असतांनाच ११ वी च्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.काही महाविद्यालयांनी कोरोनाच्या उपाययोजना न करता, नियोजन नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दखल घेतली पाहिजे.
कोरोनाच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे, या आर्थिक संकटात प्रवेश शुल्क सक्तीचे न करता त्यात टप्पे ठेवण्यात यावे व आता नुकत्याच राज्य शासनाने घेतलेल्या जे ई ई ची परीक्षा नियोजनबद्ध घेतली त्या पद्धतीने महाविद्यालयाने देखील राबवावी व विद्यार्थी यांनी देखील पालन करावे.
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांच्या आदेशाने श्रीनाथ पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सुनिल शिंपी शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नीलेश देशमुख शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राहुल गोत्राळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया, गोविंदा बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सनी गायकवाड कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस, गौरव पाटील कनिष्ठ महाविद्यालय तालुकाध्यक्ष यांनी महाविद्यालयांना आवाहन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.