Halloween party ideas 2015

श्रीरामपूरातील पोलीस "वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स अवॉर्ड"ने सन्मानित

श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान संघाच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरच्या वतीने श्रीरामपूर पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्स " अवॉर्ड देऊन सन्मान केला.
मागील सहा महीन्यांपासून कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसने सर्वत्र धुडगुस घातल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अहोरात्र जी सेवा केली तिच्या सन्मानार्थ डब्ल्यूसीपीएच्या (महाराष्ट्र) श्रीरामपूर चॅप्टरच्या वतीने शहरातील सर्व पोलिसांना
" वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरीयर्स " अवॉर्ड व प्रा.लेविन भोसले लिखीत '' वेध : सामाजिक जाणीवांचा " हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डब्ल्यूसीपीएच्या ( महाराष्ट्र) श्रीरामपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे, जेष्ठ साहित्यीक प्रा. लेविन भोसले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठलराव गोराणे, सामाजिक कार्यकर्ते बबलु गायकवाड व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.