Halloween party ideas 2015

भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून गणेश बिऱ्हाडे तर भारतीय बेरोजगार मोर्चा च्या तालुका पदी मनोज मोरे यांची नियुक्ती

अमळनेर शहरप्रतिनिधी,
अमळनेर तालुक्यातील गणेश बिऱ्हाडे यांची भारतीय युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष म्हणून तर भारतीय बेरोजगार मोर्चा च्या तालुका अध्यक्ष पदी मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील धनदाई माता कला महाविद्यालयात झालेल्या संपर्क बैठकीत बामसेफ चे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे व भारतीय युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अजय इंगळे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी हितगुज करून सर्वानुमते तरुण नेतृत्व म्हणून भारतीय युवा मोर्चा च्या तालुका अध्यक्ष गणेश बिऱ्हाडे तर बेरोजगार मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदी मनोज मोरे यांची सामाजिक बांधिलकी पाहता नियुक्ती केली आहे.
याप्रसंगी भारतीय युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अजय इंगळे यांनी उपस्थितानां मार्गदर्शन करतांना सांगितले की, सध्याचे केंद्राचे सरकार हे देशातील तरुण पिढीला मृत्यू च्या खाईत ढकलत आहे. उच्चशिक्षित मुलांना नोकरी मिळत नसल्याने ते गुन्हेगारी व व्यसनाधीन होत आहे, यामुळे जगात तरुणा चा देश म्हणून भारताची ओळख आता बेरोजगार गुलामांचा देश म्हणून बनत चालली आहे. याकरिता तरुणांनी एक संघ होऊन या सरकार विरोधात वज्रमुठ करून उगारली पाहिजे,असे मत मांडले.
याप्रसंगीउमेश प्रल्हाद बि-हाडे, सैय्यद अहमद अली, गोपाल प्रल्हाद बि-हाडे, जमालोद्दीन शेख, निखिल कैलास बैसाणे, जावेद खान रहिमखान, अजय अशोक गव्हाणे, दिपक बबनराव बि-हाडे, शेख रशिद मुशिरोद्दीन हे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन तालुकाध्यक्षांचे राष्ट्रीय किसान मोर्च्यां चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, डी.आर.सैंदाणे, राजू मोरे, प्रा.मुकूंदराव संदानशिव विश्वासराव पाटील,बाळासाहेब संदानशिव, प्रा.विजय खैरनार सर, ए.एम.मोरे, मा.दिपक बि-हाडे, प्रा.डाॅ.राहुल निकम सर, प्रा.विजय वाघमारे सर, मा.संदिपभैय्या सैंदाणे, प्रा.सुनिल वाघमारे सर, बी.एल.सैंदाणे किरण मोहिते देविदास घोडेस्वार, सोपान भवरे सर, छगन गव्हाणे आतिष बि-हाडे,विमलताई मैराळे यांनी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.