Halloween party ideas 2015

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सर्व पत्रकारांना कोरोनावरील उपचार व आयसोलेशनसाठी किमान पन्नास बेडची व्यवस्था करा.

महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी जळगांव यांना मेलद्वारे पत्र

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व पत्रकारांना कोरोनावरील उपचार व आयसोलेशनसाठी किमान पन्नास बेडची आरक्षित व्यवस्था करावी असे जळगांव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन यांनी मेलद्वारे केली आहे.

सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात पत्रकार बांधवांना दवाखान्यात सुविधा न मिळाल्यामुळे आपला प्राण गमवावा लागला. पत्रकारांना होणारी असुविधा पाहून महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर जिल्हाधिकारी ,लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आली.
कोरोना कालावधीत आपल्या जिवाची पर्वा न करता ,आपले कर्तव्य बजावत असतानाच श्री पांडुरंग रायकर व इतर अनेक पत्रकारांचे निधन झाले. तेंव्हा या विषयाला अनुसरून आपणास हे निवेदन सादर करण्यात येत आहे की,
1) पत्रकार बंधूंना उपचार चालु असताना व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावा. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी आयसोलेशनचे किमान पन्नास बेड आरक्षित करण्यात यावेत.
2) पत्रकारांसाठी पन्नास लाख रुपयांचा विमा त्वरीत काढण्यात यावा.
3) मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या वारसांना पन्नास लाखाची तातडीने मदत मिळावी.व पत्रकारांच्या कुटुंबियांनाही बेड उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी आग्रही मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या प्रत्येक जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात येत आहे.
असे ईश्वर आर. महाजन राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर
अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य यांनी केले आहे.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.