Halloween party ideas 2015

अमळनेर तालुक्यातील जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई मिळण्याचे आदेश जारी मतदारसंघासाठी 10 कोटी रुपये आमदार अनिल पाटील यांचे प्रयत्नांना यश..!

अमळनेर तालुक्यातील जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यांना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई मिळण्याचे आदेश शासनाने शुक्रवारी दिले असून जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्याचा समावेश आहे.
11 सप्टेंबर रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा पार पडली. यात हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या शासनाकडून सादर करण्यात आल्या. यापैकी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रुपये 15 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्या आर्थिक तरतुदीतून जळगाव जिल्हा व अमळनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पिककर्जाचा लाभ न घेतलेल्या व नुकसानीचा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब, कृषीमंत्री मा.ना.दादाभुसे साहेब यांनी आमदार पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन 11 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आदेशात नुकसानभरपाई जाहीर केली आहे, त्यात सन 2019 - 2020 मध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना वगळता जे यापासून वंचित आहेत त्यांना लाभ होईल व ते देखील मदत भरपाई पासून वंचित राहणार नाहीत, अमळनेर मतदारसंघात एकूण 10 कोटी रक्कम प्राप्त होणार असून जिल्ह्याला 11 कोटी रुपये मिळाले आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेल्या तालुक्यातील 52 गावातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव तृट्या दूर करून निर्णय होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथून दिली होती यापुढेही दोन वेळा मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती त्यासह विभागीय आयुक्त राजाराम माने व आमदार तहसीलदार मिलिंद वाघ व विभागीय अधिकारी यांची बैठक झाली त्यात चर्चा झाली होती. त्याबाबतीत अखेर यश प्राप्त झाले आहे, वितरित करण्यासाठी त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
तालुक्यातील 52 गावांना 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यात 9 ऑगस्ट रोजी तालुक्यात मारवड मंडळात 86 मिमी, पातोंडा 101 मिमी, वावडे 74 मिमी असा व 10 सप्टेंबर रोजी मारवड 140 मिमी, अमलगाव 80 मिमी पाऊस पडला होता या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 52 गावांच्या 23 हजार 194 शेतकऱयांच्या 19 हजार 413 हेक्टर शेतीतील शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते यासंदर्भात पंचनामे करून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पंचनाम्यांचा अहवाल सादर करण्यात आला होता.
तेव्हापासूनच आमदार अनिल पाटील याबाबत पाठपुरावा होते. त्यानंतर याबाबत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेला होता या प्रस्तावातील तृट्या तहसीलदार यांच्यामार्फत दूर करून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आयुक्तांकडे गेला व त्यानंतर शासनस्तरावर याबाबत निर्णय होऊन यश मिळावे यासाठी आमदार अनिल पाटील सतत प्रयत्न करत होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.