Halloween party ideas 2015

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे 12 सप्टेंबर रोजी टाकरखेडा, अमळनेर दौऱ्यावर.
अमळनेर येथे क्षेत्रीय कार्यालयाचे होणार उद्घाटन.

प्रतिनिधी अमळनेर.

महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे या 10 ते 12 सप्टेंबर, या कालावधीत जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे यादरम्यान अमळनेर येथेही त्या भेट देऊन क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व ग्रामीण भागातही त्या भेटी देणार आहेत.
दि.10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता जळगाव विश्रामगृह येथे आगमन होऊन तेथेच मुक्काम होणार आहे, शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 11 स्वप्नपूर्ती लोकसंचालित साधन केंद्र, जळगाव कार्यालयास भेट, उद्घाटन व कार्यकारणीसोबत चर्चा व स्टॉलला भेट.
त्यानंतर गाडेगाव, नेरी, पहूर, चिंचखेडा या गावातील समितीला तेजश्री अंतर्गत धनादेश वाटप कार्यक्रम, सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान जिल्ह्यातील पाच लोकसंचलित साधन केंद्र व्यवस्थापक सोबत आढावा बैठक, दुपारी 12 ते 1.30 माविम जिल्हा कार्यालयास भेट व स्टाफसोबत आढावा बैठक दुपारी 1.30 ते 2.30 विश्रामगृह किंवा रॉयल हॉटेल, जळगाव येथे राखीव, दुपारी 3 ते 4 जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक. दुपारी 4 ते 6 जळगाव शहरातील हेलमा माता वस्तीस्तर संघ, शिवाजी नगर, जळगाव सोबत बैठक. रेणुकामाता महिला बचत गटातील महिला सलमा ताबोली यांचा कटलरी सौंदर्यप्रसाधन दुकानास भेट. जमुना महिला बचत गट, सदाशिवनगर, खेडी, जळगाव यांच्या द्रोण, पत्रावळी, कागदी डिश व्यवसायास भेट व गटासोबत चर्चा. सायंकाळी 7 वाजेनंतर विश्रामगृह येथे आगमन व राखीव व मुक्काम त्यांचा होणार आहे.
तसेच शनिवार, दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते 11 वाजेदरम्यान टाकरखेडा गावाला भेट येथील अंगणवाडी येथे जय सतगुरु गाव विकास समिती सोबत बैठक, तेजश्री अंतर्गत बारा गरीब महिलांना धनादेश वाटप तसेच पिंपळकोटा, पिंप्री, खडके गावातील समितीला धनादेश वाटप, सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान पाळधी बु. व खुर्द गावातील फरसाण तयार करणे, अगरबत्ती व्यवसाय, मायक्रन वस्तू या गटाला भेटी. दुपारी 12 ते 1.30 जळगाव ते अमळनेर प्रवास दुपारी 1.30 ते 2 राखीव, दुपारी 2 ते 4.30 अमळनेर येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन नंतर जानवे, रणाईचे, पिंपळे, चिमणपुरी, लासुर, गणपुर, अडावद या गावातील समितीला तेजश्री अंतर्गत धनादेश वाटप, जानवी गटाच्या महिलेच्या चहा, नाष्टा सेंटरला भेट व धुळेमार्गे मुंबईकडे रवाना त्या होणार आहेत.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.