अमळनेर येथील मानसी साळुंके हिची हैदराबाद येथे कर सल्लागार म्हणून नियुक्ती
सर्वत्र अभिनंदन!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर येथील कु मानसी साळुंके हिची deliotte US ह्या आंतरराष्ट्रीय fainance कंपनीत कर सल्लागार म्हणून नियुक्ती
हैद्राबाद येथे करण्यात आली आहे.
कु मानसी ने MET management कॉलेज मधून MBA in fainance केले असून BCom ची पदवी पुणे विद्यापीठातुन प्राप्त केली आहे.कु मानसी माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय,अमळनेर येथे घेतले असून 12 वी पर्यंत चे शिक्षण प्रताप महाविद्यालय,अमळनेर घेतले आहे. कु मानसी ही उत्तम नृत्यांगना असून क्लासिकल आणि इतर नृत्य प्रकारात पारंगत आहे.तिला जर्मन भाषा ही अवगत असून ती दूरदर्शन वरील दमदमा दम ह्या नृत्य मालिकेत देखील अमळनेर शहरातून कला सादर करणारी प्रथम नृत्यांगना होती.
Deloitte ही आंतरराष्ट्रीय कन्सलटिंग फर्म असून जगात टॉप 5 टॅक्स कॅन्सलटिंग कंपनी त एक आहे.तिची ही निवड मुलाखती च्या सात फेऱ्यां मधून करण्यात आली असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कु मानसी ही पत्रकार आणि धडाडी च्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा जयश्री दाभाडे साळुंके आणि राजेंद्र साळुंके रेल्वे विभाग ह्यांची द्वितीय कन्या आहे.सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व स्तरातून तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.