Halloween party ideas 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

सदर घटनेचा तमाम आंबेडकरी जनतेतून
जाहीर तीव्र निषेध !

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह' वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे, यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे .घरातील सर्व जण सुखरूप आहेत.
सदर घटनेची तत्काळ पोलिसात तक्रार श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेबांच्या वतीने देन्यात आली आहे आणि पोलीस घटनास्थळी असलेले सी सी टीव्ही फुटेज घेऊन पुढील तपास करत आहेत. सदर घटना ही अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. सदर घटनेचा वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. सदर घटने मुले संपूर्ण जनता ही भावनिक झाली आहे. आणि कुठे तरी जनतेच्या मनात शंका येऊ लागली आहे की, आधी आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असणारे आंबेडकर भवन पडण्याचा प्रयत्न आणि आता " राजगृह" हे सर्व प्रकार आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही. परंतु सध्या राष्ट्रावर आलेले कोरोना संकट हे पाहता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि श्रद्धेय आनंदराज आंबेडकर आणि श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेब यांनी सर्व जनतेला शांत राहण्याची विनंती केली आहे. आणि कोणी ही राजगृह वर येऊ नये अशी देखील विनंती करण्यात आली आहे. सदर प्रकरणी उद्या रायगड जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य याना पत्र देऊन सदर गुन्हेगाराणा लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी आणि सदर प्रकारची सी बी आय चौकशी करून याचा सूत्रधार जनते समोर आणावा या साठी पाठपुरावा केला जाईल आणि आंबेडकर परिवाराला तात्काळ अतिम्हत्वाची झेड दर्जाची पोलीस सुरक्षा द्यावी या करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली असून संपूर्ण देशासह राज्यातील तमाम आंबेडकरी जनतेतून या निंदनीय आणि संतापजनक घटनेचा जाहीर तीव्र निषेध करण्यात येत आहे.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.