Halloween party ideas 2015


भातखंडेचे माजी सैनिक विनोद महाजन, कोविंड -१९च्या रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी सरसावले.

भातखंडे (प्रतिनिधी) भातखंडे गाव हे जणू काही सैनिकांचे गाव आहे या गावात जवळपास ४० ते ५० युवक हे सैन्यात भरती झाले आहेत.
यातीलच एक तरुण माजी सैनिक, मातृभूमी रक्षक विनोद तुकाराम महाजन की ज्यांनी २२ वर्षांपूर्वी आर्मी मेडिकल कोअर या विभागात स्वतः २२ वर्षे मातृभूमीची सेवा करून २०१८ साली ते देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. नुकतेच जगभरात कोरोणा विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त माजी सैनिक विनोद महाजन यांना देशसेवाचा वसा असल्यामुळे महाराष्ट्रात कोरोणा विषाणु महामारीने अधिक वाढल्याने तसेच जळगाव जिल्हा रेड झोन मध्ये असल्याने विनोद महाजन यांना असे वाटले की आपण या महामारी मध्ये सेवा दिली पाहिजे नव्हे ते आपले कर्तव्य बनते या कर्तव्यभावनेने अगोदर पाचोरा पोलिसांना सहकार्य केले. नंतर भातखंडे याठिकाणी सेवा दिली आणि गेल्या १९ एप्रिल २०२० पासून ते जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सिविल हॉस्पिटलला कोविड-१९ च्या रुग्णासाठी ते त्या ठिकाणी अहोरात्र सेवा देत आहे. त्यांच्या या विनामूल्य सेवा कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर भातखंडे वासियांना त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.