Halloween party ideas 2015

कोरोना च्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर कठोर शिक्षा व्हावी

रामकृष्ण पाटील

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग हादरले असून लाखो जणांचा बळी गेला आहे व जात आहेत.कोरोनाचा प्रार्दूभाव आणखी वाढू नये. म्हणून राज्य शासनाने अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात आपल्या गावाकडे मुंबई, पुणे यासह अन्य राज्यातून आपल्या घराकडे येणाऱ्या व्यक्तींचा सर्व्हे करणे, कोरोना बाबत जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविणे,वेळोवेळी हात धुणे,तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधणे,सोशियल डिस्टन्सींग पाळणे. यासाठी अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका ह्या गाव पातळीवर आपल्या जिवाची पर्वा न करता नियमित काम करत आहेत.साकेगाव ता.भुसावळ येथील अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका ह्या आज आपल्या नियमित कामकाज करत असताना गावातीलच कर्नाटकातून आलेल्या लक्ष्मण बाबुराव गायकवाड युवकाने अंगणवाडी व आशा महिला कर्मचाऱ्यांना दारू पिऊन अश्लिल शब्दात शिविगाळ केली व कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कामकाज कसे करावे असा प्रश्न पडला आहे. वरील घटनेबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्षा चेतना गवळी यांनी सरपंच व पोलीसांकडे तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेत गायकवाड यांस चांगलाच चोप देण्यात आला आणि झाल्या प्रकाराबद्दल त्याने सर्वांसमक्ष माफी मागितली.असे प्रकार जर कुठे घडत असतील तर अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे किंवा संबंधित तहसीलदार,संघटना,पोलीस,सरपंच,पोलीस पाटील यांच्याकडे तक्रार करावी. असे आवाहन रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.