माजी आमदार साहेबराव पाटलांनी वाढदिवसाचे औचित्य साधून २२ कुढुंबीयांना जीवनाश्यक वस्तूंचे केले वाटप
-सध्या देशात कोरोनाचे थैमान सुरू असल्याने व देशात लाँकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय बंद पडले आहेत. अनेक हातमजुरी करणारे नागरिकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी अमळनेर तालुक्यात अनेक समाजसेवी संघटना यांनी मदतीसाठी धावून आल्या आहेत.. आज माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचा वाढदिवस. त्याचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जोपासत गरजू जाफरी समाजातील कुढुंबीयांना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या.
अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील तांबापुरा (ख्वाजा नगर) भागात वास्तव्यास असलेली जाफरी (बलुची) समाजाच्या काही गरीब नागरीकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभर लाॅकडाऊन लागु केल्याने होणा-या उपजिविकेचा गंभीर परीणाम मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले होते. तात्काळ साहेबरावदादांनी तेथील २२ कुटू़ंबांना तुरदाळ, मुगदाळ,मठदाळ, साबुदाणे, पोहे, तेल,साखर,चहा पावडर, लाल मिरची पावडर अशा प्रतिकुटूंब रु.५६० प्रमाणे *१२३२० रु. चे.किराणा साहित्य पाठविले. सामाजिक अंतर राखत नगरसेवक श्री.नरेंद्र संदानशिव श्री.रविंद्र पाटील श्री.निलेश साळुंखे, श्री.ज्ञानेश्वर पाटील सर व फोटोग्राफर श्री.महेंद्र पाटील यांनी सदर किराणा साहित्याचे वाटप केले.....
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*


