Halloween party ideas 2015


नवापूर महामार्गावर ट्रक चालकांची भूक भागवतेय राजस्थान युवक मंडळ
-
--नवापूर-- प्रकाश खैरनार।

कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र लोकडाऊन केले आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सैन यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान युवक मंडळ व बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे २ एप्रिल पासून जुन्या सिमा तपासणी नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ६ वर ट्रक चालकांना व गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी खिचडी वाटप करीत आहे.
येथील राजस्थान युवकमंडळ व बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे शहरातील विविध भागात दररोज दोन्ही वेळ भोजन देवून ट्रक चालक व गोर गरीब कुटुंबियांची भुख भागविण्याचे कर्य सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
देशात सर्वत्र कोरोणाच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता महामार्गावरील ट्रक चालक व गोरगरीब कष्टकऱ्यांच्या अश्या बिकट परीस्थितीत महामार्गावरील ट्रक चालक व कष्टकर्यांची उपासमार होवू नये यासाठी शहरातीर सामाजिक कार्यकर्ते विजय सैन यांच्या नेत्वाखाली राजस्थान युवक मंडळाने दररोज भोजनाची व्यवस्था केली आहे.समस्त मानव जातीवर आलेले हे भिषण संकट आहे.अश्या कठीण परीस्थीतीत माणसाणी माणसांकडे माणुसकीच्या धर्मातुन पाहण्याची हीच वेळ आहे.बिकट परीस्थितीत महामार्गावरील प्रत्येक ट्रक चालकांसाठी दोन्ही वेळेस खिचडीचे पेकेट,पाणी बोटल्स व गोर गरीबांना खिचडी वाटपाचे कार्य सुरू आहे.ट्रक चालक व कष्टकर्यांची उपासमार होवू नये.लोकडाऊनमुळे अनेक गोर गरीब कुटुंबावर आर्थिक संकट निर्मीण झाले आहे.नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून राजस्थान युवक मंडळ व बाबा अमरनाथ ग्रुप आपले कार्य करीत असते.आता जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थितीत माणूसकीचा धर्म म्हणून दोन वेळ भोजनाची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने राजस्थान मित्र मंडळ व बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे दोन्ही वेळ खिचडी पॅकेटचे वाटप सुरू करून भुख भागविण्याचे कर्य सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे या स्तुत्य उपक्रमात विजय सैन,कालू यादव,मितेश शर्मा, सुरेश,अग्रवाल,अमित अग्रवाल,ध्रुवेश,अग्रवाल,रजनीकांत,अग्रवाल,शैलेश सैन,संदीप दर्जी,प्रकाश,यादव,भाविन,राणा,भिकु,मावची,संजय सोनवणे,मनिष राणा,प्रकाश राठोड,पंकज हिंगु,कालु शर्मा, दिपक शर्मा, संजय सैन,भरत नायका हे सहकार्य करीत आहेत

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.