स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी कुठेही जाण्यास तयार ----
मा.आ. डॉ. बी. एस. पाटील
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मान. मुख्यमंत्र्यांच्या विनंती नुसार माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ई -मेल पत्त्यावर (कोविडयोध्दा @जी मेल डॉट कॉम ) आपले नाव नोंदविले आहे . आणि शासनाच्या आदेशानुसार आपला स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी एक अनुभवी डॉक्टर म्हणून राज्यांत कुठेही जाण्याची तयारी दर्शविली आहे.
