Halloween party ideas 2015



माहे एप्रिल २०२० ची वेतन बिले जमा करणेसंबंधी संभ्रम दूर करून आदेश दयावा

माध्यमिक शिक्षक संघाचे मुख्यमंत्री व वित्त मंत्र्यांना पत्र

जळगांव प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर यांचे माहे मार्च २०२० चे वेतन अदा करणेबाबत आदेश निरगमित करण्यात आले होते. यानुसार पहिल्या टप्यात सर्व शिक्षक ७५% व गट ब असल्यास ५०% अदा करण्याबाबत व शिक्षकेतर कर्मचरी सध्या ज्या पदावर कार्यरत आहे ते गट क व ड नुसार अदा करण्याबाबत आदेश देण्यात आलेले होते. या टक्केवारीनुसार राज्यातील शिक्षकांचे माहे मार्च २०२०वेतन कोषागाराकडे सादर करण्यात आलेली आहेत. परंतु अद्यापही शिक्षकांना वेतन मिळालेले नाही.सदर टक्केवारीनुसार वेतन काढण्याचे आदेश फक्त माहे मार्च २०२० च्या वेतनासाठी होते.शाळांकडून दरमहा दिनांक १ ते ७ या तारखेदरम्यान वेतन बिले वेतन पथकाकडे सादर केलीजातात. एप्रिल महिन्याची २० तारीख येऊनही माहे एप्रिल २०२० च्या वेतनाबाबत कोणतही आदेश न
आल्याने एप्रिल महिन्याची वेतन देयके अद्याप शाळांनी सादर केलेली नाही.
या पत्राद्वारे आम्ही विनंती करतो की, माहे एप्रिल २०२० ची वेतन बिले स्विकारण्याबाबत आदेश व्हावेत . तसेच सदर एप्रिल महिन्याचे वेतन पूर्ण वेतन मिळावे. व मार्च महिन्याची उर्वरित टक्केवारीची वेतन देयके माहे एप्रिल २०२० च्या वेतन देयकासोबत सादर करावी किंवा कसे ? याबाबतही आदेश व्हावेत.
प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार शासनापुढे पगार संकट निर्माण झाल्याची चर्चा असून यामुळे नियमित पगार मिळेल किंवा काय अशी भिती शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे याबाबत शासनाकडून योग्य ती माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी कृपया माहे एप्रिल२०२० च्या वेतनाबाबत व माहे मार्च २०२० च्या उर्वरीत वेतनाबाबत योग्य तो खुलासा शासनाकडून व्हावा अशी विनंती
शालिग्राम भिरूड सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)
यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.