Halloween party ideas 2015


*अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन येत्या 2, 3 दिवसात मिळणार-आ.स्मिता वाघ*

अमळनेर,धुळे तसेच शिंदखेड़ा तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गांवासाठी जिवनवाहिनी असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पाचे पहिले आवर्तन येत्या 2 ,3 दिवसात मिळनार असून याबाबत धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट आ.स्मिता वाघ यांनी घेतली.

साधारत: अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे पहिले आवर्तन 15 एप्रिल च्या अगोदर मिळत असते त्यामुळे अमळनेर,धुळे,तसेच शिंदखेड़ा तालुक्यातील गांवाना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पासून मुक्ति मिळत असते परंतु यंदा आवर्तन मिळण्यासाठी जळगांव जिल्हा परिषदेच्या आवश्यक प्रस्ताव जळगाव कलेकटर यांच्याकडे पाठविला गेला तिथून प्रस्ताव धुळे जिल्हा प्रशासनकडे रवाना करण्यात आला होता पण धुळे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे आवर्तन मिळण्यास उशीर होत होता ही बाब लक्ष्यात घेवून आ.वाघ यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सभापती बापु खलाणे यांच्या माध्यमातून तातडीने आवश्यक प्रस्ताव धुळे जिल्हा प्रशासनास सादर केला असून तांत्रिक अड़चन दूर झाली आहे.याबाबत आ.स्मिता वाघ व धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती बापूसाहेब खलाने यांनी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव व निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड़ यांची भेट घेवून आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली येत्या दोन दिवसात नदिवरिल स्थित बंधाऱ्यावरील पाट्या काडण्याचे काम करण्यात येणार असून त्यानंतर आवर्तन सोडन्यात येणार आहे.पांझरा नदिवरिल काठावरील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यवाहिस योग्य सहकार्य करुण आवर्तनाचे पाणी पांझरा-तापी संगमापर्यंत पोहचु द्यावे असे आवहन .आ.स्मिता वाघ यांनी केले आहे. यावेळी धुळे जि.प. कृषी सभापती बापूसाहेब खलाणे व माजी प.स. सभापती डॉ. दिपक पाटील उपस्थीत होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.