स्तुत्य उपक्रमातुन संदेश...!!
नवापूर ;-हेमंत पाटील
समाजात अनेक लोक आपला वाढदिवस मोठा खर्च फाटा करून साजरा करत असतात. वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झालेला दिवस असतो हा प्रसंग आनंदाच्या की दुःखाच्या हा प्रश्न समोर येतो जीवनातील या प्रसंगाला कसे घ्यावे हे प्रत्येक व्यक्तीच्या आचार व विचारावर अवलंबून असते तर काही व्यक्ती आपल्या उपक्रमातून समाजाला एक चांगला संदेश ही देत असतात.
नवापूर शहरातील मांदा सोसायटीच्या सौ. वैशाली दगा साळुंखे यांनी आपल्या वाढदिवस एका स्तुत्य उपक्रमाने साजरा करुन एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना महाविषाणुमुळे सर्वत्र लाँकडाऊन आहे उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीत गोरगरीबांची उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे , अश्या परिस्थितीत वाढदिवसा निमित्ताने नवापूर शहरातील धडधड्या अंबेमाता मंदिर रेल्वेफाटक जवळील भागात जाऊन शेकडो गरजू गरीब लोकांना अन्नदान करून वैशाली साळुंखे यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधीलकी जपत साजरा केला आहे . सौ.वैशाली साळुंखे या सध्या औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कार्याला सेवा उपक्रम हाती घेतलेल्या राजु गावीत,जितेंद्र अहिरे , दर्शन पाटील , पप्पू मावची , कमलेश मावची व संजय मावची मित्र परिवाराने सहकार्य केले.

