Halloween party ideas 2015

कोरोनाचे पाश्वभूमीवर

"आम्ही थांबतो कामावर तुमच्यासाठी..
मात्र घरी थांबा तुम्ही आमच्यासाठी"
असे ब्रीदवाक्य म्हणुन २४तास कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी.
जरी बाकीच्या विविध विभागातील शासकीय वर्गातील कर्मचारी, की ज्यांना लॉकडाऊन च्या प्रसंगी सुट्या दिल्या असतांना,ते घरीच असुन आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स,आरोग्य सेवा देणारे सारे कर्मचारी हे रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, घरोघरीं जाऊन व रस्त्यावर येऊन, लोकांच्या आरोग्यासाठी आपले कर्तव्य पार पाडीत असतांना देखील,
त्यांचे नियमित मासिक वेतन जर वेळेवर होत नसेल तर यापेक्षाही दुसरी शोकांतिका कोणती असू शकेल.
हि बाब दर महिन्याला घडणारी आहे,शासकीय कर्जाचे हप्ते, LIC चे हप्ते, गृहकर्ज,चे चे व्याज मुलांची फी, औषधोपचार खर्च,घरभाडे,किराणा,दुधइत्यादी देणे आवश्यक असल्यावर..
त्यातही शासनाकडून २५ टक्के वेतन कपात करून ७५ टक्केच वेतन देण्यात येणार असूनही तोही वेळेत न झालेला नसतांना, तसेच
कोणत्याही प्रकारचा.. हेवादावा की.. "याला सुटी-आम्हांला का नाही" असे नकरता, तंतोतंत आपली जबाबदारी पार पाडून सेवा करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, तरी अशा वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कोणी तरी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.