रांगोळीतुन संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न .
पारोळा
येथिल शिंदे गल्ली मधिल रहिवाशी गणेश नारायणसा क्षत्रिय यांची सुकन्या व इयत्ता १० वीची विदयार्थीनी कु जान्हवी उर्फ खुशी क्षत्रिय ही सुंदर रांगोळ्या काढते . तीला शेजारी राहणारे राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी कोरोना बाबत रांगोळीचे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले .
कु .जान्हवी इने विविध रंगांची रांगोळी वापरत जगावर पावसा सारखा कोरोना विषाणुचा वर्षाव होत आहे . त्यापासुन छ्त्री म्हणजे संरक्षक म्हणुन डॉक्टर, परीचारिका, पोलीस , सफाई कामगार व काही मिडिया कार्य करीत असुन नागरिकांनी घराबाहेर पडु नका , सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा, हातांना सॅनिरायझर लावा . असा संदेशही व पृथ्वी त्या रांगोळीत रेखांकित केली आहे .
कु जान्हवीच्या या कलाकृतीचे सर्व नेटकरी कौतुक करीत आहेत .
