महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे पहिले ऐतिहासिक राज्य अधिवेशन राज्यस्तरीय शिक्षण परिषद 11 ते 13 मार्च औरंगाबाद येथे राज्य शासनाच्या अवर सचिव स्वप्नील कापडणीस यांनी दिलेल्या पत्रान्वये विशेष कर्तव्य रजे सह संपन्न होणार होती. विशेष कर्तव्य राजे संदर्भाचा शासनादेश राज्यातील शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे नावे दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी संकीर्ण 2020 प्र क्र 37 टी एन टी 1 अन्वये राज्यभर निर्गमित करण्यात आले होते.
दरम्यान आज दिनांक 9 मार्च 2020 सोमवार रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्याचे
*आरोग्यमंत्रीनामदार राजेशभैया टोपे यांच्या सूचनेवरून *औरंगाबाद येथे सपंन्न होणारे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यस्तरीयअधिवेशन राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार सन्मान सोहळा कोरोना विषाणू च्या प्रतीबंधात्मक उपाय योजनेसाठी तूर्तास स्थगीत करण्यात आले आहे .पुढील तारीख जी शासन देईल ती यथा अवकाश कळविण्यात येईल*असे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा राज्याचे प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी कळविले आहे.
कोरोणा विषाणू पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आदींनी देखील स्पष्ट सूचना निर्गमित केल्यामुळे सदरील पहिले राज्य अधिवेशन, आणि अधिवेशनातील सर्व उपक्रम काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.
* विशेष कर्तव्य रजेचा हाच शासनाचा जीआर पुढील अधिवेशनासाठी तारीख बदलून वापरता येणार.
*नोंदनी पावतीवर तारीख/दिनांक नसल्यामुळे हिच पावती पुढील अधिवेशनात वापरण्यात येणार आहे*
*राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सुद्धा पुढील शासन आदेश नुसार होणाऱ्या अधिवेशनात पार पडेल*
*अधिवेशनासाठी अनेक शिक्षकांनी आपला संघटना अभिनेवेश बाजूला ठेवून आम्हाला देणगी स्वरूपात मदत केलेली आहे* तसेच आमचा सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी आम्हाला पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे राज्यातील सर्व शिक्षकांचे, सर्व क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आजी-माजी मान्यवर व सर्वशिक्षक संघटनांचे आम्ही सदैव ऋणी राहू. असेही यावेळी बोलताना किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.
आपल्या महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे पहिले राज्य अधिवेशन आणि राज्य स्तरीय शिक्षण परिषद आणि राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा आपल्या सर्वांच्या मदतीने आमचा पहिला प्रयत्न होता व तो पुढे आपल्या मदतीने पार पडेल तसेच राज्य अधिवेशनाच्या व्यासपीठावरून शिक्षकांच्या काही प्रश्नांना धोरणात्मक वाचा फुटेल असा स्पष्ट विश्वास किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केला.
*
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे औरंगाबाद येथे होणारे 11 ते 13 मार्च 2020 दरम्यान चे पहिले राज्य अधिवेशन हे *कोरोना विषाणुचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे अधिवेशन रद्द करण्याच्या सूचना *मा नामदार राजेशभैया टोपे* *(आरोग्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य)* यांनी आजच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या पदाधिका-ना वैद्यकिय अधिका-याच्या बैठकीत तश्या सूचना दिल्या आहेत. तसेच मा कैलास गोरंट्याल यांनी देखील आपले अधिवेशन तूर्तास स्थगीत करावे आसे सुचविले आहे.,पुढील अधिवेशनातही मा नामदार वर्षाताई गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री ) यांना उपस्थीत राहण्यासाठी मी स्वतः विनंती करणार असे आश्वासन त्यांनी समता शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.राज्य शासनाने आपल्या अधिवेशनासाठी काढलेला अध्यादेश यामध्येच विशेष कर्तव्य राजा 11 ते 13 मार्च (तीन) दिवसासाठी सहभागी सर्व शिक्षक बंधू भगिनींना देण्याचे सुस्पष्ट आसल्यामुळे, पुढील अधिवेशनात आज नोंदनी केलेल्या सर्व शिक्षकांना या विशेष कर्तव्य रजेचा लाभ मिळणार आहे . तसेच सदरील अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी टप्पा क्रमांक एक ची नावे जाहीर करण्यात आली होती.सर्वांना 12 मार्च 2020ला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार होते. सर्वांना निवडीचे पत्र देण्यात आले होते ते निवडीचे पत्र कायम राहील फक्त बारा मार्च ऐवजी वरिष्ठांकडून पुढे जी तारीख मिळेल त्यावेळेस राज्य अधिवेशनातच सन्मानाने राज्य पुरस्कार सोहळा घेण्यात येईल. आता तूर्तास संबंधितांनी आपली निवड अधिकृत जाहीर करायला हरकत नाही.पुरस्कार वितरण सोहळा राज्य आरोग्य मंत्र्यांच्या धोरणामुळे व आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेमुळे लांबणीवर पडत असल्या बद्दल क्षमस्व.
करिता महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने सर्वांना सुस्पष्ट कळविण्यात येत आहे की नोंदणी केलेल्या सर्व शिक्षंकांना या कँलेंडर वर्षात केव्हाही आपल्या नोंदनी पावतीचा लाभ घेता येतो.
- सर्व जबाबदारी ने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर ,तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य नेते विलास इंगळे,राज्यसमन्वयक मा पि यू आरसूड ,दत्तात्रे माघाडे ,जालना जिल्हातून अच्यूत साबळे परमेश्वर साळवे बबनराव शिंदे ,अजय गायकवाड व सर्व जिल्हाअध्यक्ष ,राज्य पदाधिकारी सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी ,तालूका पदाधिकारी यांनी आतिशय मेहनत घेऊन शिक्षकापर्यत पोहचण्याचे काम केलेले आहे .राज्य शाखेच्या वतिने राज्यातील हाजारो शिक्षकांचे आभार मानले असून
या सबंधी अधिक माहीतीसाठी संपर्क 7030887190.करावा असे आवाहन केले.
