Halloween party ideas 2015


जि प उच्च प्राथमिक शाळा खेडीढोक ता पारोळा येथे महिला सन्मान सप्ताहाचा समारोप
दि ९ शेळावे ता पारोळा
जि प उच्च प्राथमिक शाळा खेडीढोक ता पारोळा येथे जागतिक माहिला दिना निमित्त महिला सन्मान व नारी चेतना सप्ताहाचे आयोजन मुख्याध्यापक दयानंद महाजन,मंजुषा नारखेडे, स्मिता देसले, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, नितिन पाटील यांच्या संकल्पनेतुन विविध कार्यक्रम व उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला . याबाबत गावात जागृती व्हावी म्हणुन बेटा बेटी एक समान, लेक वाचवा लेक शिकवा, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी अशा घोषणा देत विदयार्थ्यांनी प्रभात फेरी काढली . गांवातील ग्रामपंचायत सदस्य, अंगवाडी सेविका, आशा सेविका, शेतकरी महिला, जास्त शिक्षण घेतलेल्या युवती यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
मुख्याध्यापक दयानंद महाजन यांनी स्त्री पुरुष समानते बाबत माहिती देऊन ग्रामिण महिलांनीही आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याचे आवाहन केले .
मंजुषा नारखेडे व स्मिता देसले यांनी महिलांचे अधिकार हक्क संरक्षण याबाबत माहिती दिली .
स्मिता देसले यांचा त्यांच्या लेकिच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांनी शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊंचा कसा मोलाचा वाटा आहे हे सांगुन स्त्री शक्तीची महानता प्रगट केली .आज विदयार्थीनींनी कर्तबगार महिला व राष्ट्रमातांचा पेहराव करुन त्यांचे कार्य सर्वांना समोर मांडले . यात राजमाता जिजामाता, झाशीची राणी, कल्पना चावला, क्रांतीज्योती सावित्री बाई फुले, किरण बेदी , सरोजिनी नायडु, लता मंगेशकर, बहिणाबाई चौधरी, इंदिरा गांधी, माता रमाई, कस्तुरबा गांधी, पीटी उषा अशा कर्तबगार महिलांच्या भूमिका पार पाडुन सप्ताहाचा समारोप केला .
उप शिक्षक नितिन पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार मानले .
ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाचे कौतुक करून विदयार्थ्यांना रोख बक्षिसे दिली .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.