.कोविड. 19 (कोरोना) मुळे जग विळख्यात सापडले आहे. कोरोना
संपूर्ण जगभरात पसरलेली महामारी आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता
निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी, कोरोना या संसर्गजन्य
आजाराच्या संसर्ग व प्रादुर्भावापासून बाचावासाठी अमळनेर शहर फॉर्मलडीहाईट 10 टक्के सोल्युशनची फवारणी करुन निर्जतूकीकरणाची मोहीम अमळनेर नगरपरिषदेने दिनांक 24 मार्च, 2020 पासून सुरु केली असून सुरुवातीस नगरपरिषदेचा लहान ट्रॅक्टर 300 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर सोल्युशन याप्रमाणे 4 फेऱ्या, दुसरा ट्रॅक्टर निशांत अग्रवाल,नगरसेवक यांचा 600 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर सोल्युशन याप्रमाणे 2 फेऱ्या याप्रमाणे तीन दिवस फवारणी झाली असून शहर लवकर निर्जंतुकरणासाठी आज 27 मार्च, 2020 पासून अग्नीशमन दलाची गाडी टाकी पाणी क्षमता 6000 लीटर पाण्यामध्ये 50 लिटर सोल्युशन याप्रमाणे 2 फेऱ्या याप्रमाणे फॉर्मलडीहाईट 10 टक्के सोल्युशनची फवारणीचे काम सुरु असून पुढील 2 दिवसात संपूर्ण शहरात फवारणीचे काम पूर्ण करण्यात येणारआहे.
यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, लोकनियुक्त नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,
सभापती, मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका व आरोग्य विभागाचे
अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.
