दयाराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन, आज राहत्या घरापासून सकाळी निघणार अंंत्ययात्रा
अमळनेर- तरवाडे (ता. अमळनेर, (ह.मु. माधव नगर, अमळनेर) येथील रहिवासी तथा माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक दयाराम विठ्ठल पाटील (वय- 74) यांचे आज दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता 6) सकाळी अमळनेर येथील ढेकू सिम रोडवरील माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. ते जय योगेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, सुनिल पाटील, दिपक पाटील, माध्यमिक शिक्षक प्रविण पाटील यांचे वडील तर प्रा आर. व्ही. पाटील यांचे जेष्ठ बंधू होत.
