Halloween party ideas 2015


लोकमान्य विद्यालय डॉ.सी.व्ही रामन वैज्ञानिक परीक्षा संपन्न

जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्यातर्फे घेतली जाणारी डाॅ.सी.व्ही रामण बालवैज्ञानिक परीक्षा लोकमान्य विद्यालयात दिनांक ८ मार्च २०२० रोजी उत्साहात पार पडली. यावेळी लोकमान्य विद्यालय हे परीक्षा केंद्र होते, या परीक्षा केंद्रावर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या सराव व्हावा या उद्देशाने जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्यातर्फे दरवर्षी डॉ.सी.व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षेचे आयोजन करण्यात येते. तर अमळनेर तालुक्यात प्रथमच ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे अमळनेर तालुका समन्वयक म्हणून तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले लोकमान्य विद्यालय,अमळनेर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा समन्वयक राकेश विसपूते,चोपडा हे देखील परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. यापरीक्षेसाठी भूषण महाले, मधुकर सोनार व सायली देशपांडे यांनी सहकार्य केले. याकामी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नचिकेत महाले व प्रसाद जोशी यांनी देखील परीक्षा केंद्रावर उपस्थिती देऊन सहकार्य केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.