Halloween party ideas 2015


*पुणे विद्यापीठ युवा साहित्य महोत्सवात प्रताप महाविद्यालयाच्या निर्भय धनंजय सोनार ने पटकावले 2 प्रथम पारितोषिक!*
अमळनेर- मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरीय वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने प्रथम क्रमांक पटकावला.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय निमगाव आयोजित पुणे विद्यापीठाच्या युवा साहित्य महोत्सवात श्री अत्याचार - भय इथले संपत नाही या विषयावर निर्भयला प्रथम पारितोषिक मिळाले तर कथाकथन स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावत निर्भय सोनार याने प्रताप महाविद्यालयाचे शिरपेचात तुरा खोवला. त्यास संध्याताई हिरे व मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अत्यन्त मानाच्या या स्पर्धेत राज्यभरातून अनेक महाविद्यालयाचे स्पर्धक सहभागी झाले होते.
प्राचार्या ज्योती राणे, प्रा रमेश माने, प्रा नितीन पाटील, प्रा संदीप नेरकर, डिगंबर महाले, डॉ जी एम पाटील, प्रा पराग पाटील, सचिन खंडारे, प्रा लीलाधर पाटील, प्रा अशोक पवार, प्रा पी टी धर्माधिकारी, प्रा एस ओ माळी, गणेश खरोटे, रवींद्र विसपुते, शयाम सोनार, संजय सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ तसेच सुवर्णकार संघ यांनी निर्भयच्या या यशा बद्दल अभिनंदन केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.