Halloween party ideas 2015


उपोषण आंदोलन मुंबईत आलेल्या पायाभूत पदावरील नाशिक विभागातील महिला शिक्षिकेची तब्येत अचानक बिघडली सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल ----
नवापूर - (प्रकाश खैरनार ) राज्यातील उच्च माध्यमिक विभागाच्या वाढिव/ प्रस्थावित पदांचा शिक्षकांना पदमान्यता व वेतनासहित वारंवार मागणी करुन सुद्धा वेतन न मागणी पूर्ण न झालयाने आजपासुन बेमुदत आंदोलन पुन्हा सुरु होणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व वाढिव पदांवरील शिक्षक मुंबई येथील आझादमैदानावर मिळेल त्या साधनाने मुंबई गाठण्यासाठी प्रयत्न करत असताना नाशिक विभागातील महिला शिक्षकेची तब्येत अचानक बिघडलयाने त्यांना सेंट जार्ज रूग्णालयात मुंबई येथे दाखल करण्यात आले असे असून अजून किती दिवस उपाशीपोटी काम करायला शासन भाग पाडणार आहे . एकिकडे बारावी बोर्डाच्या परिक्षेचे सुपरविजन , पेपर तपासणी आणि शाळेतील दैनंदिन कार्य सांभाळून मुंबई सारख्या ठिकाणी जवळजवळ 12 ते 15 तासाचा प्रवास करणे निदान महिला शिक्षकांना जमणे अशक्य असुन सुध्दा आपल्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी हा आटापिटा या महिला शिक्षकांना करावा लागत आहे हा चरचर्चेचा विषय बनला आहे निदान आज तरी या शिक्षकांना या शासनाने यांच्या पदांना वेतनासहित मान्यता देऊन यांच्या वरिल अन्याय दूर करायलाच हवा तरच 8 मार्च हा महिला दिन साजरे करणे सार्थक ठरेल कारण पुढील वातावरण अतिशय तिव्र उन्हाळा राहणार असून परिक्षेचा कालावधी राहणार आहे तरी या आंदोलनाची आजच सा़गता या शासनाने करायला हवा योगायोगाने शिक्षण मंत्री देखील एक महिला असल्याने एका महिला दुसऱ्या महिलेला नक्कीच न्याय मिळवून देतील व पुन्हा कोणत्याही महिलेला असे आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना दवाखान्यात जाण्याची गरज येणार नाही अशी मागणी आजच्या आंदोलनात सहभागी शिक्षक - शिक्षिकां कडुन करण्यात येत आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.