*कासोद्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा सेवेत*
कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी :- येथील अंगणवाडी सेविका ५ महिन्यांच्या बहू प्रतिक्षे नंतर आज पुन्हा सेवेत हजर .
रंजना माधवराव मराठे यांना ग्रामस्थांच्या तक्रारीने एरंडोल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. सैलजा पाटील यांनी इंदिरा नगर भागातील अंगणवाडी क्र. २२ येथे दि. १ आक्टोबर २०१९ रोजी चौकशी अंती ५ महिन्यांपर्यंत हलगर्जीपणाचे कारण देऊन सेवामुक्त केले होते . परंतु अंगणवाडी सेविका रंजना मराठे यांनी जळगांव जिल्ह्या जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे अपिल केले असता. CEO यांनी सकस चौकशी करून रंजना मराठे यांच्या पक्षात निकाल दिला असून , त्यांना दि.२८ फेब्रुवारीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पत्रात अति व शर्तीसह तात्पुरती व अस्थायी स्वरूपाची नेमणुक केल्याचे एरंडोल येथिल बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.सैलजा पाटील यांनी दि. ३ मार्च २०२० रोजी सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.