*कासोदा प्रतिनिधी* :- येथील शेतकऱ्यांच्या चारही मुलांनी भारतीय लष्करात यश संपादन केले.
सविस्तर असे की .मागील महिन्यात १० जानेवारी २०२० रोजी परभणी येथील लष्कर भरतीत मैदानी चाचणीत पास होऊन दि. २३फेब्रुवारी २०२० रोजी पेपर घेण्यात आला होता. त्यांचा दि. ४ मार्च रोजी निकाल लागला यासर्वांनी त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्य दलात आपली जागा तयार केली. या सर्वांना
पंच प्राणेश्वर मंदिरात साधना हायस्कूल चे मा. प्रा. सी.जी. पाटीलसर यांनी २ वर्षांपासून अभ्यासिका उघडून कासोद्यातील ३० ते ४० विद्यार्थांना मोफत मार्गदर्शन करून शिक्षण देते होते . हे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून कुठेही ऑकेडमित न जाता पंच प्राणेश्वर अभ्यासिकेत यश संपादन करून लष्करात भरती झालेत , तर एक विद्यार्थी नागपूर कोर्टात शिपाई या पदावर कार्यरत आहे. मा. प्रा.सी.जी. पाटील सर व लष्करात भरती झालेल्या चारही विध्यार्थी निलेश अमर पाटील , कपिल युवराज पाटील , चेतन नाना पाटील , अतुल सुरेशसिंग परदेशी यांचे सर्वच स्थारांवरन कौतुक केले जात आहे ,
भारत मातेच्या रक्षणाची धुरा सांभाळण्यासाठी , पोलीस आर्मी , MPSC , UPSC साठी कासोद्यातून अजून १५० ते २०० मूल दररोज मैदानी व लेखी परीक्षा ची पूर्व तयारी करत असून यासर्वांना मोलाचे असे मार्गदर्शन मा. प्रा.सी.जी. पाटील सर व पालक , गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे .पंचप्रानेश्वर अभ्यासिके भाहेर सर्व विध्यार्थ्यांनी पेढे वाटप करत फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.