Halloween party ideas 2015


कोरोनो विषाणूच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशात हाहाकार माजवला असतांना शासन व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. अमळनेर तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी ,संघटना यांनी जनतेला मास्कचे वाटप करून स्वच्छता व जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यदूत
म्हणून कार्यरत असून समाजसेवा आपल्या रक्तात आहे. असा आरोग्यदूत व कळमसरे येथील भाजपचा कट्टर कार्यकर्ता व आमदार स्मिताताई वाघ यांचा विश्वासू शिवाजी राजपूत यांनी आमदार स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त कळमसरे परीसरात मास्कचे वाटप करून आरोग्य जनजागृती व कोरोना विषाणू पासून आपल्या बचावासाठी घरीच आपल्या परीवाराबरोबर राहावे व कुठेही फिरायला जावू नये याबाबत मार्गदर्शन केले.त्यांच्या या उपक्रमाचे आमदार स्मिताताई वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.